Sunday, April 28, 2024
Homeजळगावडिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 15 डिग्रीने पारा घसरणार

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 15 डिग्रीने पारा घसरणार

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

गेल्या दोन ते तीनदिसांपासून तापमानात घसरण होत असल्याने हवेत थंडीचा जोर वाढला आहे. शनिवारी 15 डिग्री सेल्सीअसपर्यंत तापमान नोंदविले गेले आहे.

- Advertisement -

त्यामुळे दिवसासुद्धा थंडीचा गारठा अंगाला झोंबत असल्याचे जाणवत होते. येत्या दोन दिवसात 2 डिग्रीने तापमान वाढणार आहे.

त्यानंतर 1 ते 5 डिसेंबर दरम्यान 14 ते 15 डिग्रीने तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज वेलनेस वेदर शाळेने वर्तविला आहे.

दिवाळी झाल्यानंतर तापमानाचा पारा घसरुन थंडीचा गारठा वाढतो. मात्र, यावर्षी ढगाळ वातावरणामुळे दिवाळीत गारठा जाणवला नाही.

मात्र, आठवड्याभरानंतर थंडीची चाहूल लागली असून सध्या दोन ते तीन दिवसापासून बोचर्‍या थंडीचा हवेत गारठा वाढल्याने घरातील ऊबदार कपडे बाहेर येऊ लागली आहेत.

दि. 24 नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता वाढली असून 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान काही ठिकाणी आंशिक ढगाळ वातावरण असून शनिवारी 15 डिग्री सेल्सीअसने पारा घसरला आहे.

त्यामुळे दिवसभरात गारठा जाणवत होता. दि.29 ते 30 नोव्हेंबर रोजी तापमानाचा पारा 2 डिग्री अंशसेल्सीअसने वाढणार आहे.

त्यामुळे वातावरणात बदल होऊन थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. पुन्हा दोन दिवसानंतर 1 डिसेंबरपासून 14 ते 15 डिग्री अंश सेल्सीअसने पार्‍याची घसरणार होणार आहे. त्यामुळे थंडीची तीव्रतादेखील वाढणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या