Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याटेलीग्रामचे नवे अपडेट : आता व्हिडीओ कॉलद्वारे 'इतके' लोक जोडले जाणार

टेलीग्रामचे नवे अपडेट : आता व्हिडीओ कॉलद्वारे ‘इतके’ लोक जोडले जाणार

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

टेलीग्राम (telegram) नेहमीच आपल्या युझर्ससाठी नवीन अपडेट घेऊन येते. आता टेलीग्रामने नवीन वैशिष्ट्यांच्या सिरीजची घोषणा केली आहे…

- Advertisement -

टेलीग्रामच्या माध्यमातून १ हजार युझर्सला ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये (Group video call) सहभाग घेणे शक्य होणार आहे. तसेच युझर्सला व्हिडिओ संदेशदेखील (Video message) पाठवता येणार आहे.

आता सर्व व्हिडीओ कॉलला (Video call) ध्वनीसह स्क्रीन शेअरिंग करता येणार आहे. ज्यात वन ऑन वन कॉलसह (one on one call) अनेक गोष्टींचा समावेश आहे.

याबाबत टेलीग्रामने म्हटले आहे की, पृथ्वीवरील सर्व मानवांचा समूह कॉलमध्ये समावेश होईपर्यंत ही मर्यादा आम्हाला वाढवायची आहे. कंपनीने १ हजार युझर्सला व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.

३० युझर्स त्यांच्या कॅमेरा (Camera) आणि स्क्रीन (Screen) दोन्हीवरून व्हिडिओ प्रसारित करू शकतात. याचा वापर विशेषतः ऑनलाइन व्याख्याने, सेमिनारसाठी फायदेशीर ठरणार आहे.

तसेच, टेलीग्रामने आपले व्हिडिओ मॅसेज फीचर अपडेट केले आहे. व्हिडिओ गॅलरीमध्ये (Gallery) दुसरा व्हिडिओ न जोडता व्हिडिओ शेअर (Video sharing) करण्यासाठी हे फिचर अत्यंत वेगवान आहे. चॅट बॉक्समधील रेकॉर्डिंग (Recording) बटणावर टॅप केले की आपल्या कॉन्टॅक्ट्सपर्यंत (Contacts) तो व्हिडिओ पोहोचणार आहे. हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह केला जाणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या