Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनटोलवसुलीवरून अभिनेत्री तेजस्वीनी पंडितही संतापली, फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ केला शेअर

टोलवसुलीवरून अभिनेत्री तेजस्वीनी पंडितही संतापली, फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ केला शेअर

मुंबई | Mumbai

टोल दरवाढीवरुन मनसे पुन्हा आक्रमक झाली असून राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत टोलवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. राज ठाकरेंनी अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या टोलदर कमी करण्याबाबतच्या वक्तव्यांचे व्हिडीओच सर्वांना दाखवले. हे व्हिडीओ शेअर केल्यावर राज ठाकरे म्हणाले की, “टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे.

- Advertisement -

त्यानंतर आता मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हे काय बोलतायत हे त्यांना कळतंय का? आम्ही जो टोल भरत आहोत तो कोणाच्या खिशात जातोय? असा प्रश्न तेजस्विनीनं हा व्हिडीओ शेअर करत विचारला आहे. सोबतच यावर आता तुम्हीच काहीतरी करा, असं राज ठाकरेंना म्हटलं आहे.

तेजस्विनी पंडितचं ट्वीट काय?

देवेंद्र फडणवीसांना खासगी वाहनांकडून टोलवसुली केली जात नसल्याचं वक्तव्य करताच अभिनेत्री तेजस्वी पंडितनं फडणवीसांचा हा व्हिडिओ ट्वीट करत फडणवीसांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं. तेजस्वी पंडितनं म्हटलं आहे की, फडणवीसांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कोणाच्या खिशात जात आहे? राजसाहेब तुम्ही आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा या टोल धाडीतून! माननीय उपमुख्यमंत्री असे विधान तरी कसे करू शकतात, असं ट्वीट तेजस्विनी पंडित हिने केलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

टोला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे. मला असं वाटतं याची शहानिशा झाली पाहिजे. येत्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडून काय उत्तर येतंय ते पाहू. नाहीतर आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल नाही, तर आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील आणि टू व्हिलर, फोर व्हिलरा टोल लावू दिला जाणार नाही. जर याला विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या