Friday, April 26, 2024
Homeनगरकरोना नियमांचे पालन न करणार्‍यांवर तहसीलदारांची कारवाई!

करोना नियमांचे पालन न करणार्‍यांवर तहसीलदारांची कारवाई!

सुपा (वार्ताहर) –

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी गुरुवारी दुपारी सुपा येथे नगर- पुणे महामार्गावर धावणार्‍या एसटी बसेसची

- Advertisement -

तपासणी करत करोना विषयक नियम मोडणारांवर कारवाई केली.

पारनेर तालुक्यामध्ये करोना प्रतिबंधक नियमावलीचे नागरिकांकडून पालन केले जाते का? यासंदर्भात तहसीलदार देवरे यांनी वेगवेगळ्या गावांना भेटी देत नियमावलीची अंमलबजावणी होत नसेल तेथे कारवाई सुरू केली आहे. काल त्यांनी सुपा येथे विविध ठिकाणी पाहणी करत नियम मोडणार्‍या व्यावसायिक व दुकानदार यांच्यावर कारवाई केली. यावेळी नगर-पुणे हायवेवर जाणार्‍या प्रवासी वाहतूक बसची पाहणी केली. त्यातील 15 ते 20 प्रवाशांवर मास्क न लावल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. एसटी गाड्यांतून प्रवासी वाहतूक मोठ्या संख्येने सुरू झाली आहे. या प्रवासात करोना रोखण्यासाठी तयार करण्यात आलेले नियम धाब्यावर बसविण्यात येत आहेत. यामुळे शहरात वाढत असलेला संसर्ग आता गाव-खेड्यात पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

विनामास्क प्रवास करणार्‍या व्यक्तींची संख्या जास्त प्रमाणात आहे. बसमधील अनेक प्रवासी मास्कचे नियमही पाळले जात नाहीत. एसटीच्या बसेसमधून प्रवास करताना कोणत्याही प्रवाशांची चाचणी होत नाही. त्यामुळे प्रवासातच करोनाची बाधा होण्याचा धोका आहे. प्रवासात सुरक्षित अंतर ठेवण्याच्या नियमाचेही पालन होत नाही. यामुळे करोना नियमांना पायदळी तुडवून हजारोंच्या संख्येने वाहतूक सुरू आहे. यासाठी तहसीलदार देवरे सुपा बसस्थानक चौकामध्ये नगर तसेच पुणे या शहरातून येणार्‍या प्रवासी वाहतूक करणार्‍या बस थांबून नियमाचे पालन न करणार्‍या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

प्रवाशांनी बसमध्ये बसताना करोनासंदर्भातील नियमांचे पालन करावे. तसेच बसमध्ये कोणीही विना मास्क आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रवाशांना बसमध्ये उभे राहून प्रवास करण्यास मनाई आहे.

– ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर.

- Advertisment -

ताज्या बातम्या