Friday, April 26, 2024
Homeधुळेमुलींची छेड: वादातून जैताणेत खून

मुलींची छेड: वादातून जैताणेत खून

धुळे । Dhule । प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील जैताणे (Jaitane) येथे काल सायंकाळी मोठा वाद झाला. एका मुलीची छेडखानी (Teasing of girls) करणार्‍यांना एकाने समजविल्याचा रागातून (From perceived anger) पाच जणांनी त्याच्यासह त्यांच्या पित्यावर खिळ्यांची फळी व सळईने हल्ला चढवित बेदम मारहाण (brutal beating) केली. त्यात पित्याचा मृत्यू (Father’s death) झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा (crime) दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

- Advertisement -

मुनाफ गफ्फार मन्यार असे मयत तर असरार मन्यार असे जखमीचे नाव आहे. याबाबत शाहरूख शेख अकिल शेख (वय 24 रा. सावीत्रीबाई फुले चौक, वाचनालयाच्या मागे, जैताणे) याने निजामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काल सायंकाळी साडेसात ते पावणे आठ वाजेच्या सुमारास सागर अनिल खैरनार व मगन उर्फ निलेश भदाणे यांनी एका अल्पवयीन मुलीचा हात पकडला. म्हणून त्यांना असरार मन्यार यांनी असे करू नका, असे सांगितले. त्याचा राग येवून सागर याने बांधकामाच्या ठिकाणी पडलेल्या खिळ्याच्या लाकडी फळीने असरार मन्यार यांना मारहाण सुरू केली. तेव्हा असरारचे वडील मुनाफ मन्यार हे भांडण सोडविण्यासाठी धावून आले. त्यावेळी अनिल खैरनार, सतिष व गोल्या उर्फ योगेश यांनी देखील मुनाफ मन्यार यांना मारहाण केली. दोघांनी त्यांचे हात धरून ठेवले. तर सागर व मगन या दोघांनी लाकडी फळी व सळईने त्यांच्या डोक्यावर मारून खाली पाडत मुनाफ मन्यार यांचा खून केला.

याप्रकरणी सागर अनिल खैरनार, मगन उर्फ निलेश भदाणे, अनिल खैरनार, सतिष व गोल्या याच्या विरोधात भादंवि कलम 302, 307, 143, 147, 148, 149, 354, 354 अ सह पोस्को कायदा 2012 चे कलम 12, 18 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि श्रीकांत पाटील करीत आहेत.

दरम्यान घटनास्थळी मोठी गर्दी आणि तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, एसडीपीओ प्रदीप मैराळे, सपोनि श्रीकांत पाटील यांनी पथकासह घटनास्थळी भेट देत शांततेचे आवाहन केले. तसेच आरोपींनाही अटक करण्यात आली. गावात तणावपुर्व शांतता असून पोलिस लक्ष ठेवून आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या