Monday, April 29, 2024
Homeजळगावपोराच्या वर्दीवर चमकले पीएसआयचे स्टार अन् बापाच्या डोळ्यात तराळले अश्रू

पोराच्या वर्दीवर चमकले पीएसआयचे स्टार अन् बापाच्या डोळ्यात तराळले अश्रू

सावखेडा, (Savkheda) ता. रावेर वार्ताहर

मुलाची (child’) शिक्षण (education) घेण्याची आवड आणि जिद्द पाहता शेळ्या चारणार्‍या बापासह (Goat herding father) कुटूंबाने पोटाला चिमटा घेत मुलाला शिकवले. मुलानेही आपल्या बापाचे आणि कुटूंबाच्या कष्टाचे चिज (cheese of hardship) करत पोलिस दलात (police force) हवालदार म्हणून प्रवेश केला. हवालदार या पदावरच समाधान न मानता हवालदाराची नोकरी सांभाळत एमपीएस्सी ची परिक्षा (MPSC Exam) दिली. पहिली संधी हाताची सुटली. पण निराश न होता पुन्हा जिद्दीने प्रयत्न केला आणि पीएसआयच्या परिक्षेत (PSI exam) पास झाला. दहा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्याच्या वर्दीवर पीएसआय पदाचे स्टार (Star of PSI post on uniform) चमकले तसे बापाच्या डोळ्यात अश्रू तराळले (Tears glistened). आणि शेळ्या चारणार्‍या बापाचे पोर अशी असलेल्या ओळखीवर आता बदलून पीएसआय पोराचा बाप म्हणून शिक्कामोर्तब झाले. हा प्रसंग ज्यांनी ज्यांनी अनुभवला त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. चित्रपटाला शोभेल अशी कहाणी असली किंवा चित्रपटासारखी कहाणी असली तरी ती आता प्रत्यक्षात घडली आहे. काय आहे ती सत्य कहाणी वाचाच..

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील कुसुंबे ता. रावेर येथील राजू अशोक भास्कर या पीएसआय पदी निवड झालेल्या युवकाचे नुकतेच सत्र क्रमांक ११९ चे महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे दहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाले.

कुसुंबे या खेडेगावातील राजू अशोक भास्कर हा शेळ्या राखणाऱ्यांचा मुलगा. मोठे भाऊ रोजंदारीने कामाला जातात. मात्र, लहान भाऊ राजू यांची शिक्षणाप्रती असलेली जिद्द पाहून कुटुंबाने शिक्षणासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. त्यांने सुरुवातीला पोलिस हवालदाराची नोकरी सांभाळून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) झालेल्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी १८ तास अभ्यास केला. त्यात ते यशस्वी झाले. राज्यात १०२ क्रमांक मिळविला. राजू भास्कर यांनी लहानपणापासून गरिबीचे चटके सहन केले. त्यांच्यातील गुणवत्ता ओळखून कुटुंबाने मजुरी व शेळीपालन करून त्यांना शिकवले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झाले.

ते तेथील शिक्षकांचे आवडते विद्यार्थी होते. उच्च माध्यमिक व महाविद्यालयात इंग्रजी विषयात ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. अपयश हे त्यांच्या आयुष्यात जणू लिहिलेच नव्हते. परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्यांनी पोलिस दलात नोकरी मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. पोलिस हवालदार म्हणून पुणे पोलिस दलात निवड झाली व त्यांनी प्रशिक्षण काळात प्रथम क्रमांकसुद्धा मिळविला. परंतु, लहानपणापासूनच जिद्दी स्वभाव असल्याने ते तिथेच न थांबता अधिकारी पदावर कसे जाता येईल, यासाठी त्यांनी सतत कष्ट केले.
पोलिस खात्यातील नोकरी सांभाळून एमपीएसीसाठी कठोर परिश्रम घेतले. २०१६ला घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत अवघ्या दोन मार्कानी पोस्ट गेली. आयुष्यात ते पहिल्यांदा अयशस्वी झाल्यामुळे त्यांना हे दुःख कायम मनात बोचत होते.पण ते तिथेच थांबले नाही.

सुदैवाने २०१७ मध्ये लगेच एमपीएससीची जाहिरात निघाली. त्यांनी ठाम निश्चय करून या परीक्षेत यश मिळविले. अभ्यासासाठी स्वत:ला कोंडून घेत स्वतंत्र खोली घेतली. या परीक्षेत ३२२ पदांमध्ये राज्यात १०२ रँक मिळवत त्यांनी घवघवीत यश मिळविले. नुकतेच सत्र क्रमांक ११९ चे महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे दिशांत संचलन झाले त्यात पीएसआय राजू अशोक भास्कर हे ०१८ वा रँक मिळवत पास झाले.

त्यांनी १० महिन्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. ज्या आई वडिलांनी व भावाने मोलमजुरी राजू भास्कर यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या व त्यांच्या पत्नी च्या डोळ्यात आनंदाश्रू अनावर झाले .त्यांनी राजू भास्कर यांचे तोंडभरून कौतुक करून त्यांचे पीएसआय पदाचे स्टार ओपन करून सत्कार केला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पीएसआय झालेल्या युवकाची जिद्द, चिकाटी व मेहनत हि येणाऱ्या भावी पिढीसाठी एक आदर्श असून येणाऱ्या भावी पिढीने पीएसआय राजू भास्कर यांची प्रेरणा घेऊन दिशा ठरवावी, असे मत त्यांचे वडील अशोक भास्कर यांनी व्यक्त केले आहे.

अशोक भास्कर

- Advertisment -

ताज्या बातम्या