Wednesday, April 24, 2024
Homeनगरशिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतनाचा हिशोब त्वरीत द्यावा

शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतनाचा हिशोब त्वरीत द्यावा

संगमनेर (प्रतिनिधी) / Sangamner – अहमदनगर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना त्यांच्या अंशदान निवृत्ती वेतन (डी.सी.पी.एस.) योजनेअंतर्गत कपात झालेली कर्मचार्‍यांची रक्कम शासन हिस्सा व त्यावरील व्याज याचा हिशोब त्वरित घेऊन तो राष्ट्रीय वेतन (एन. पी. एस.) खात्यात जमा करावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. किशोर डोंगरे व सरचिटणीस महेश पाडेकर यांनी दिला आहे.

माध्यमिक विभागाच्या वेतन पथक कार्यालयात लेखाधिकारी श्री. गादीकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना अजून डी.सी.पी.एस. हिशोब पावत्या मिळालेल्या नाही तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन खाते (एन. पी. एस.) दोन महिने उघडून सुद्धा खात्यात आधीची रक्कम व आत्ताची रक्कम आलेली नाही, त्यामुळे शिक्षकांनी संघटनेकडे तक्रार केली होती, त्या अनुषंगाने कर्मचार्‍यांची भविष्य निर्वाह निधीची कपात झालेली रक्कम शासन कुठे गुंतवत आहे ते कसे गुंतवत आहे व निवृत्तीनंतर ती कशी मिळणार या संदर्भात ऑनलाईन किंवा ऑफलाईन कार्यशाळेचे आयोजन करून शिक्षकांना संपूर्ण माहिती देऊन शिक्षकांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी शिक्षक भारतीय संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, जिल्हा उपाध्यक्ष रामराव काळे, सचिन जासूद, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल चंदनशिवे, सरचिटणीस महेश पाडेकर यांच्यासह सर्व जिल्हा, तालुका, पदाधिकारी शिक्षक भारती संघटना अहमदनगर आदींनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या