Thursday, April 25, 2024
Homeनगरदिवाळीची सुट्टी कमी केल्याने शिक्षक संघटना आक्रमक

दिवाळीची सुट्टी कमी केल्याने शिक्षक संघटना आक्रमक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

5 नोव्हेंबर 2020 आणि 29 ऑक्टोबरला शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या निर्णयांचा तसेच दिपावलीच्या सुट्या कमी केल्याने

- Advertisement -

त्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शिक्षक भारती संघटनेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.

शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षात शिक्षकांना 76 सुट्ट्या घेण्याचा अधिकार दिलेला आहे. दरवर्षी शिक्षकांना 18 दिवसांची दिवाळीची सुट्टी दिली जाते. करोनाचे कारण पुढे करून शिक्षण विभागाने यावर्षी केवळ पाच दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कोव्हिड ड्युटी करत आहेत.

ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम करत आहेत. मे महिन्यामध्ये लॉकडाऊनमुळे शिक्षकांना, कर्मचार्‍यांना स्वतःच्या गावी सुद्धा जाता आलेले नाही. 15 जूनपासून नियमितपणे ऑनलाईन शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. तसेच विद्यार्थ्यांना तासन्तास ऑनलाईन शिक्षणासाठी बसून राहावे लागत आहे. बालकांच्या मानसिक स्थितीचा विचार करून दिवाळीची सुट्टी देणे आवश्यक आहे.

याचा गोष्टींचा विचार करून शिक्षण विभागाने 18 दिवसांची सुट्टी जाहीर करणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता केवळ पाच दिवस सुट्टी देण्यात आली आहे. तसेच ट्रेनमधून प्रवास करण्यास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना बंदी असतानाही 50 टक्के उपस्थितीचा शासन निर्णय काढला गेलेला आहे. तसेच दीपावली सुट्टीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक भारतीचे आ. कपील पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी शिक्षण मंत्री यांना निवेदन दिले आहे.

जिल्हाधिकारी आंदोलनावेळी शिक्षक नेते आप्पासाहेब जगताप, जिल्हा माध्यमिकचे सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, योगेश हराळे, संभाजी चौधरी, संतोष देशमुख, दादा घालमे, शरद कारंडे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर ङोंगरे, संभाजी पवार, श्रीकांत गाडगे, विलास गाडगे, रेवन घंगाळे, जॉन सोनवणे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या