Saturday, April 27, 2024
Homeनगरशिक्षक आणि शिक्षकेत्तरांची देयके, वेतनातील फरक ऑफलाईन

शिक्षक आणि शिक्षकेत्तरांची देयके, वेतनातील फरक ऑफलाईन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित शाळेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे

- Advertisement -

वैद्यकीय देयके, सुधारित वेतन संरचना लागू केल्यानंतर देय असणारा वेतनातील फरक (थकबाकी), इत्यादी ऑफलाईन पध्दतीने अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यामध्ये खालील प्रकारच्या देयकांचा समावेश राहील.

राज्यातील मान्यता प्राप्त अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना भविष्य निर्वाह निधी किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू नसल्याने सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनाची थकबाकी एकरकमी रोखीने अदा करण्याबाबत दि.17 फेब्रुवारी 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील मान्यताप्राप्त पुर्णतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांना नवीन परिभाषित निवृत्तीवेतन योजना लागू आहे अशा कर्मचार्‍यांच्या सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी डीसीपीएस स्तर-2 खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

शासन निर्णय दिनांक 10.01.2020 अन्वये अर्धवेळ आणि अंशत अनुदानित शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी ज्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना अथवा भविष्य निर्वाह निधी योजना लागू नाही अशा कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी शासन निर्णयातील खंड ब) मध्ये नमूद केलेल्या रकमा वजा/समायोजित करून 5 समान हप्त्यांत 5 वर्षात रोखीने अदा करण्याबाबत मान्यता दिलेली आहे. यातील पहिला हप्ता अदा करण्यात येणार आहे.

राज्यातील मान्यता प्राप्त पूर्णतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांना नवीन परिभाषित निवृत्तीवेतन योजना लागू आहे अशा कर्मचार्‍यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला हप्ता डीसीपीएस स्तर 2 खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या