Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशिक्षकांची अन्नत्याग दिंडी : शिक्षण मंत्र्यांसोबत लवकरच बैठक

शिक्षकांची अन्नत्याग दिंडी : शिक्षण मंत्र्यांसोबत लवकरच बैठक

नाशिक ।प्रतिनिधी

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान द्यावे, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे. यासाठी औरंगाबाद येथून चार शिक्षक अन्नत्याग पायी दिंडीने मंत्रालयाकडे निघाले आहेत.

- Advertisement -

आज (दि.११) आंदोलनाचा सोळावा दिवस असून प्रकृती खालावल्याने ते दोन-तीन दिवसापासून नाशकातच आहेत. दरम्यान, शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दखल घेत सकाळी या शिक्षकांना घेऊन ते मुंबई ला रवाना झाले आहेत. दुपारी आंदोलक शिक्षकांसह आमदार किशोर दराडे हे शिक्षण मंत्र्यांसमवेत चर्चा करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही याबाबत चर्चा झाली असून यातून मार्ग निघेल, असे आमदार किशोर दराडे यांनी सांगितले. शिक्षणमंत्र्यांसमवेत होणाऱ्या चर्चेतून मार्ग निघाला तरच हे आंदोलन मागे घेतले जाईल ,नाही तर आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरूच राहील, असे आंदोलकांच्यावतीने सांगण्यात आले.

औरंगाबाद येथून आंदोलक शिक्षक येवला येथे आले असता आ.दराडे यांनी नारळपाणी घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार आठ दिवसापासून ते नारळपाणी घेत होते. दरम्यान चालण्यास त्रास होत असल्याने आंदोलकांनी नैताळे येथुन चालण्यासाठी वाॅकर घेतले.निफाड येथुन अनुदानित शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते.

दरम्यान, निफाड माध्यमिक संघटनेच्यावतीने तीन हजार रु निधी देण्यात आला होता.प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान द्यावे, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे, यासाठी औरंगाबाद येथून चार शिक्षक अन्नत्याग पायी दिंडीने मंत्रालयाकडे निघाले आहेत.

नवयुग शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रा. गजानन खैर, अनिस कुरेश यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या