Saturday, April 27, 2024
Homeनगरशिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार - मंत्री शंकरराव गडाख

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – मंत्री शंकरराव गडाख

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पुरोगामी विचारांच्या जिल्ह्यात शिक्षकांचे काम मोठे आहे. शिक्षकांच्या अनेक अडचणी आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी

- Advertisement -

करोना संकट निवाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य शिक्षक समिती यांची भेट घडून आणू व शिक्षकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

राज्य शिक्षक समिती व गुरूकुल शिक्षक मंडळ यांच्यावतीने नगरमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून मंत्री गडाख उपस्थित होते. शिक्षकांच्यावतीने मंत्री गडाख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे होते.

यावेळी राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी, राज्याध्यक्ष डॉ. संजय कळमकर, जिल्हाध्यक्ष संजय धामणे, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष नितीन काकडे, गुरूकुल मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे, सिताराम सावंत, वृषाली कडलग, इमाम सय्यद, भास्कर नरसाळे आदी उपस्थित होते. प्रारंभी नितीन काकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मंत्री गडाख म्हणाले, खासदारांचा मुलगा म्हणून घेण्यापेक्षा मला एका शिक्षकाचा मुलगा म्हणून घ्यायला आवडते. शिक्षकांच्या अनेक मागण्या असून पेन्शन ही एक प्रमुख मागणी आहे.

निवडणूक काळात शिक्षकांना अनेक कामे असतात, त्याकाळात शिक्षकांवर दबाव असतो. शैक्षणिक कामे करण्यापेक्षा अशैक्षणिक कामे शिक्षकांना करावे लागतात. यामुळे शिक्षक आजारी पडतात. निवडणूक काळात शिक्षक आजारी पडल्यानंतर त्यांचे आजारपणाचे बिल निघत नाही.

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी 24 तास उपलब्ध आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न असून याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा करून काही प्रश्न तत्काल निकाली काढण्याचा प्रयत्न करू. शिक्षकांच्या प्रश्नाबाबत शिक्षकांना वार्‍यावर सोडणार नसून राज्य शिक्षक समिती व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घडून शिक्षकांचे प्रश्न मार्ग लावू असे मंत्री शंकरराव गडाख यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना रा. या. औटी म्हणाले, शिक्षकांना शैक्षणिक कामा पेक्षा अशैक्षिक कामे जास्त करावी लागतात. निवडणूक काळात अधिकारी शिक्षकांना त्रास देतात. डॉ. कळमर म्हणाले, शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागल्यास अनेक शिक्षकांच्या कुटूंबात प्रकाश निर्माण होईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकारणी नाही, सरळ मनाचे आहेत. सरळ मनाचा माणूस कधी काय निर्णय घेईल हे तुम्हाला आम्हाला देखील कळणार नाही. नाहीतर मागचे होते. ते फक्त हिशोब करायचे. हिशोबामध्ये माणसाच्या प्रश्नाला किंमत राहत नाही, असा टोला मंत्री गडाख यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या