Tuesday, April 23, 2024
Homeनंदुरबारट्रकने चिरडल्याने शिक्षकाचा मृत्यू

ट्रकने चिरडल्याने शिक्षकाचा मृत्यू

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

करोनाची चाचणीसाठी तळोदा येथे जाणार्‍या शिक्षकाच्या मोटरसायकलीला ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना डामरखेडा ता.शहादा येथे घडली.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दि. 19 रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील चिमठावल येथे दिवाळीच्या सुटीनिमित्त राजेंद्र मधुकर पाटील (40) हे शिक्षक गेले होते.

राज्य शासनाने दि. 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यापुर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

त्यानुसार राजेंद्र पाटील हे काल दि.19 रोजी तळोदा येथे चाचणीसाठी मोटरसायकल (क्र.एमएच 18-बीएस 6948) ने जात असतांना डामरखेडा-प्रकाशा दरम्यान गोमाई नदीच्या पुलाजवळ त्यांची दुचाकी अचानक घसरल्याने ते रस्त्यावर पडले.

त्याचवेळी मागावून येणार्‍या ट्रक (एमएच 26-बीई1869) याच्या मागच्या चाकात चिरडले जावून त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत शहादा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून ट्रकचालक सोमनाथ कालुसिंग पाडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ रामदास पाडवी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या