Saturday, April 27, 2024
Homeनगरशिक्षक पात्रता परीक्षेत अवघे 3.70 टक्के उत्तीर्ण

शिक्षक पात्रता परीक्षेत अवघे 3.70 टक्के उत्तीर्ण

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

राज्यात 2021 साली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल अखेर जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल अवघा 3.70 टक्के आहे. राज्यभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मात्र उत्तीर्णांचे प्रमाण अल्प असल्याने त्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

राज्यात 21 डिसेंबर 2021 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी पहिली ते पाचवी पेपर पहिला आणि सहावी ते आठवी पेपर दुसरा याचा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केला आहे. परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी 4 लाख 68 हजार 679 हजार एकूण परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 17 हजार 322 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सध्या राज्यात पवित्र पोर्टलद्वारे टीईटी उत्तीर्ण उमेदवारांची भरती केली जाते.

राज्य सरकार 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती करणार आहे. सध्या विद्यार्थ्यांची आधार जोडणी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची एकूण संख्या कळेल आणि त्यानंतरच 30 टक्के भरती केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अशा पल्लवीत झालेल्या आहेत.

बोगस विद्यार्थी बाहेर

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेचा घोटाळा बाहेर आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली होती. सुमारे आठ हजार विद्यार्थी घोटाळा करून उत्तीर्ण झाल्याची बाब समोर आली होती. त्यांच्यावर शासन कारवाई करत सेवेतून कमी करण्याचे निर्देश दिले होते. वेतन थांबविण्यात आले होते. यातील काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे निकाल प्रक्रिया पूर्ण करण्यास अडचणी आल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या