Friday, April 26, 2024
Homeनगरसर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा; शिक्षक भारती आक्रमक

सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा; शिक्षक भारती आक्रमक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ यांच्या आदेशानुसार सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यव्यापी बेमूदत संप करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

शिक्षक भारती संघटना समन्वय समितीचा घटक आहे. तसे पत्रच राज्य सरकारला शिक्षक भारतीचे आ. कपील पाटील राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी दिले आहे. राज्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी सातत्याने संघर्ष करत असून कर्मचार्‍यांनी या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 21 सप्टेंबर रोजी राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करा, या एकाच मागणीसाठी तीव्र लक्षवेधी आंदोलन झाले.

मुंबईत सर्व संघटनांनी आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतला आहे. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांनी बेमुदत संपाच्या हाकेला प्रतिसाद देऊन जुनी पेन्शन मिळेपर्यंत लढा सुरु ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या निर्णयानुसार 21 ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीत जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी बेमुदत संपाची मानसिक तयारी करण्याची मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या