Thursday, May 9, 2024
Homeनगरशिक्षक बँक निवडणुकीसाठी बनवाबनवी

शिक्षक बँक निवडणुकीसाठी बनवाबनवी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षक बँकेची निवडणूक लवकर व्हावी व गुरुमाऊलीचे भ्रष्ट संचालक लवकरात लवकर पायउतार व्हावेत, अशी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची इच्छा आहे. निवडणूक लवकर घ्यावी, म्हणून आम्ही किती प्रयत्नशील आहोत हे जिल्ह्याला दाखवण्यासाठी गुरुमाऊलीचा एक स्वतःच स्वत:ला स्वच्छ म्हणवणारा गट न्यायालयात गेला. सर्व संचालकांना अध्यक्षपदाची संधी मिळावी, म्हणून या गटाने कधी स्वतःचा तर सत्ता असल्याने कधी बँकेचा वकील अनुपस्थित ठेवून सुनावणी पुढे ढकलत नेली. बँकेच्या निवडणुकीसाठी गुरूमाऊली मंडळाची बनवाबनवी सुरू असल्याचा आरोप गुरूकुल मंडळाने केला आहे.

- Advertisement -

गुरूमाऊली मंडळाने निवडणुकीचा दिखावा करून सभासदांच्या डोळ्यात धूळफेक करण्यापेक्षा संचालकांना राजीनामे द्यायला लावले असते, तर यापुर्वीच बँकेची निवडणूक होऊन गेली असती, असा आरोप रा. या. औटी, संजय धामणे, नितिन काकडे, सुदर्शन शिंदे, वृषाली कडलग, इमाम सय्यद, बाळासाहेब अनपट, सुनील नरसाळे, प्रताप पवार यांनी केला आहे. करोनात अनेकांना तोटा झाला असला तरी बँकेचे संचालक व नेते म्हणवणार्‍यांनी या संकटाचे संधीत रूपांतर केले. झालेला अध्यक्ष आमच्याच गटाचा आहे, असे दाखवून त्यांच्याकडून अवैध कामे करून घेण्याचा सपाटा लावला.

नेत्यांचे आर्थिक लाड पुरवावे लागतात म्हणून एका अध्यक्षाने तर वैतागून राजीनामा दिला. दर चार सहा महिन्याला अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या नवीन निवडी करून नेते मंडळी स्वतःचे हित साधत आहेत. विशेष म्हणजे संचालक मंडळ यांचेच असताना वाटा न मिळालेले गुरुमाऊलीचे नेते स्वतःच्या संचालकांविरुद्धच पत्रकबाजी करत आहेत. बिकट वाटणारा करोनाचा काळ गुरुमाऊलीसाठी फायद्याचा ठरला आहे. सहकार खाते नियमाप्रमाणे 31 जुलैच्या आत बँकेच्या निवडणुका घेणारच आहे, त्यामुळे कोर्ट कचेर्‍यांची नौटंकी गुरुमाऊलीने बंद करावी, असा सल्ला विजय अकोलकर, सुनील बनोटे, गोकुळ कहाणे, भास्कर नरसाळे, प्रल्हाद साळुंके, शिवाजी रायकर, अशोक कानडे, संजय नळे, संपत सोनवणे, माऊली बोडखे, सुखदेव मोहिते, दशरथ देशमुख, गणपत देठे, कैलास ठाणगे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या