Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याशासकिय कार्यालयांचे कोटींचे कर थकीत

शासकिय कार्यालयांचे कोटींचे कर थकीत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मनपाच्या थकबाकीत (arrears) झालेली वाढ लक्षात घेत विविधकर विभागाद्वारे (Tax Department) वसूलीसाठी कडक भूमिका हाती घेतल्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

शासकिय कार्यालयांच्या माध्यमातून 7 कोटी 64 लाख रुपये थकलेले आहेत. या सर्व बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर ‘ढोल बजाव’ सोबतच जप्तीची नोटीस (Notice of forfeiture) बजावल्याने सर्वांचेच धाबे दणाणलेले आहेत. मनपाच्या कडक धोरराचे स्वागत करण्यात येत आहे. मनपाच्या सहाही विभागातून मागिल आठवड्यात एका आठवड्यात 338 घरांसमोर ढोल वाजवून 81 लाखांची वसुली करण्यात मनपाला यश आले होते.

मनपा प्रशासनाने सहाही विभागात विविध अधिकारी व कर्मचार्‍याच्ंया टीम बनवून वसूलीबाबत विशेष मोहीम हात घेतल्याने 8 कोटी 71 लाख, 87 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. यातील 3 कोटी 46 लाख हे टीमच्या माद्यमातून वसूल झाले आहेत. दिवाळीनंतर ढोल बजाव मोहीम सुरू झाल्यानंतर किमान घरपट्टीतील (House Tax) थकबाकी वसुलीत चांगले यश आले.

प्रथमच मार्च महिन्याच्या सूरूवातीलाच मनपाच्या वसूलीने 150 कोटीचा आकडाही पार केला होता. साधारण 180 कोटीची घरपट्टी (House Tax) वसुली झाली. ही बाब लक्षात घेत पुढील वर्षी 250 कोटीची घरपट्टी वसुलीचा अंदाज धरला आहे. दरम्यान, शासकिय कार्यालयांच्या माध्यमातून मागील आर्थिक वर्षातील 6 कोटी 67 लाख 66 हजार रुपये येणे बाकी आहे. त्यातील चालू मागणीपैकी 96 लाख 93 हजार 192 रुपये असून, चालू अर्थिक वर्षातील एकुण मागणी 7,64,59,238 रुपये येणे बाकी आहे.

या कार्यालयांना मनपाच्या माध्यमातून जप्त का करु नये या आशयाची नोटीस (notice) बजावर्‍यात आलेली आहे. त्यात प्रामुख्याने पश्चिम विभागातील अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो (Anti-Corruption Bureau) (1कोटी 88 लाख), युनायटेड कमर्शिअल बँक (United Commercial Bank) (एक कोटी 79 लाख) यांच्यासह 9 आस्थापनांकडून 5 कोटी 48 लाख 79 हजार210 रुपये, नाशिक रोड (nashik road) विभागातील 4 आस्थापनातून 1 कोटी 50 लाख, 8 हजार, 39 रुपये तर सातपूर (satpur) विभागातील अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्थेकडे (All India Local Swaraj Organisation) 65 लाख71 हजार 992 रुपये थकित आहेत.

मनपाच्या गाळेधाकरांकडून 8 कोटी 71 लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. जप्ती वारंट बजावलेल्यांमध्ये नाशिक पश्चिममध्ये 137, सिडकोत 81, नाशिकरोड 50, नाशिक पूर्व 31, पंचवटी 48, सातपूरमधील 44 थकबाकीदारांचा त्यात समावेश आहे.

येत्या 19 दिवसात जास्तीत जास्त वसुलीचा प्रयत्न ठेवण्यात आलेला असून,थकबाकीदारांनी थकबाकी न भरल्यास त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई हाती घेतली जाणार आहे.

– अर्चना तांबे उपायुक्त

- Advertisment -

ताज्या बातम्या