Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याखाजगीकरणाचा डाव विरोधकांचाच

खाजगीकरणाचा डाव विरोधकांचाच

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिकेतील पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीचे खाजगीकरण करण्याचा डाव हा विरोधी पक्षांतील काही स्थानिक पुढार्‍यांनी रचला असल्याचा गंभीर आरोप महापालिका सभागृह नेते सतिश सोनवणे यांनी केला आहे.

- Advertisement -

उलटपक्षी आम्ही विषयांचे गााभीर्य लक्षात घेऊन प्रस्ताव मागे घेत खाजगीकरणाऐवजी स्थानिक सु शिक्षीत बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी देण्याची भूमिका सत्ताधारी पक्षाने घेतली असल्याचेही सभागृह नेत्यांनी स्पष्ट केले.

महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील सभागृह नेते सतिश सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीचे खाजगीकरणासंदर्भातील सत्ताधार्‍यांची भूमिका स्पष्ट केली. यासंदर्भात बोलतांना सोनवणे म्हणाले, पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीचे खाजगीकरणाच्या बाबतीच्या प्रस्तावासंदर्भात सत्ताधार्‍यांच्या विरोधात व पक्षाची बदनामी होईल अशी माहिती देऊन विरोधी पक्ष जनतेची दिशाभूल करीत आहे.

मुळात विरोधी पक्षांतील काही स्थानिक पुढार्‍यांनी पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीचे खाजगीकरण करण्यासाठी संबंधीत मक्तेदाराशी गुप्त बैठक घेतली, गुप्त बैठकीनंतर आयुक्त यांची भेट घेऊन प्रशासनावर सत्तेचा दबाव आणुन महासभा क्रमांक 10 मध्ये जादा विषय क्रमांक 399 दि. 7 डिसेंबर 2020 अन्वये मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुल बाह्य अभिकरणामार्फत करणेबाबत विषय दाखल करण्यात आला आहे, असेही सोनवणे यांनी स्पष्ट करीत विरोधकावर गंभीर आरोप केला.

पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीचे खाजगीकरण विषयाचे गांभीर्य लक्षात घेत सत्ताधारी भाजपने तातडीने हा प्रस्ताव मागे घेतला व प्रस्तावात खाजगीकरणाऐवजी सुशिक्षीत स्थानिक बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी या प्रस्तावाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली, असेही सोनवणे यांनी सांगितले. ठेकेदाराचे पांढरे करण्याचा डाव फसल्यामुळे दु:ख सेनेच्या पदाधिकार्‍यांना झाले असावेत.

भाजप हा खाजगीकरणाच्या विरोधात असुन शासनाच्या जाचक अटींमुळे काही क्षेत्रात सेवेचे नाईलाजास्तव व जनतेला मुलभूत सुविधा देण्यासाठी खाजगीकरण करावे लागत आहे. सध्या राज्यात ठाकरे सरकार असुन कथित पुढार्‍यांनी शासनाकडुन मनपा नोकर भरतीला परवानगी आणावी असा सल्लाही सभागृह नेत्यांनी सेनेच्या पदाधिकार्‍यांना पत्रकार परिषदेत दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या