Thursday, April 25, 2024
Homeनगरकर वसुलीसाठी कोपरगाव पालिका आक्रमक

कर वसुलीसाठी कोपरगाव पालिका आक्रमक

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

नगर परिषदेमार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षाची 100 टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आक्रमक झालेल्या कोपरगाव नगरपालिकेने ढोल बजाव करत विशेष वसुली मोहीम सुरू केली. पाठोपाठ शहरातील मुख्य चौकामध्ये थकबाकीदारांची नावांचे बॅनर झळकविल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

नगर परिषदेकडून सन 2022-23 या आर्थिक वर्षासह थकबाकीच्या 10 कोटी मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यापारी संकुल दुकानभाडे, मोबाईल टॉवर जागा भाडे आदींच्या वसुलीसाठी झोन निहाय वसुली पथके नियुक्त करण्यात आले आहेत. या वसुली मोहिमेसाठी शुक्रवारी पालिकेने ढोल बजाव करीत रणशिंग फुंकले होते.

ज्यामध्ये मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करणे, नळ जोडणी खंडित करणे, नगर परिषद व्यापारी संकुलातील दुकानास सिल ठोकणे, थकबाकीदारांची नावे वृत्त पत्रात प्रसिध्द करणे, तसेच शहरातील मुख्य चौकामध्ये थकबाकीदारांची नावे बॅनरद्वारे प्रसिध्द केली जाणार आहेत, असा इशारा पालिकेतर्फे दोन दिवसांपूर्वी देण्यात आला होता.

शनिवारी दुसर्‍या दिवशी शहरातील सावरकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आई तुळजाभवानी मंदिर, बाजारतळ याठिकाणी थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर नगरपालिकेने लावले आहेत. जे नागरिक व व्यापारी या मोहिमेत नगर पालिकेचा कर भरणार नाहीत. अशा विरुध्द जप्तीची मोहीम राबविण्यात येणार आहे.त्यामुळे नागरिकांनी नगर पालिकेला सहकार्य करण्याची गरज असल्याचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या