Friday, April 26, 2024
Homeनगरआरतीचा वाद विकोपाला

आरतीचा वाद विकोपाला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सूर्यनगरमधील गणेश मंदिरातील वाद विकोपाला पोहचला आहे. पुजारी व महिलांना मारहाण करत काही समाजकंटकांनी आरतीस विरोध केल्यानंतर शिवसेनेने त्याची दखल घेतली.

- Advertisement -

उद्या गुरूवारी शिवसेनेकडून मंदिरात पूजा-आरती केली जाणार असल्याची माहिती शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.

तपोवन रोडवरील सूर्यानगर येथील नागरिकांना काही समाजकंटकांनी पूजा,आरती करण्यास बंधन घालून त्यांना आणि महिलांना बेदम मारहाण केली. गत तीन- चार दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक बोलावून हे समाजकंटक या परिसरातील नागरिकांवर दहशत करत आहे.

कोणत्याही धर्माच्या नागरिकांना पूजा, आरती करू नका तसेच त्यांना मारहाण करण्याचा अधिकार कोणालाच नाही. समाजकंटकांनी महिलांना निर्दयपणे मारहाण केली, तरीही तोफखाना पोलीस यावर गंभीर दखल घेत नाही. नागरिकांवर होणारा अन्याय शिवसेना कदापी सहन करणार नाही.

– दिलीप सातपुते, शिवसेना शहर प्रमुख.

- Advertisment -

ताज्या बातम्या