Saturday, May 11, 2024
Homeनगरतपोवन रोडवर भरदुपारी तीन फ्लॅट फोडले

तपोवन रोडवर भरदुपारी तीन फ्लॅट फोडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घराला कुलूप लावून देवीच्या दर्शनासाठी बुर्‍हाणनगर येथे गेलेल्या दत्तात्रय शंकर तागड (वय 35) यांचा फ्लॅट फोडून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा 21 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. तपोवन रोडवरील राधेश्‍वरी अपार्टमेंटमध्ये 28 सप्टेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी दत्तात्रय तागड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान तागड यांच्या अपार्टमेंटशेजारी असलेल्या गंगोत्री अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट फोडून 16 हजार 500 रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. या प्रकरणी सतिष गोरख दळवी (वय 26) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसून येत आहेत. दिवसा फ्लॅट फोडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी तपोवन रोड परिसरातील नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या