Friday, April 26, 2024
Homeनगरनगर : टँकर चालकाकडून पोलीस कर्मचार्‍याला मारहाण

नगर : टँकर चालकाकडून पोलीस कर्मचार्‍याला मारहाण

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

नागापूर एमआयडीसीतील गरवारे चौकात नाकाबंदीसाठी असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍याला

- Advertisement -

शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करणार्‍या टँकर चालकाविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सुर्यभान कदम (वय- 32 रा. मांजरसुंबा ता. नगर) असे या टँकरचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस नाईक किरण बबन कोळपे यांनी फिर्याद दिली आहे. गुरूवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली. नेहमीप्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी एमआयडीसीतील गरवारे चौकात नाकाबंदीच्या ड्यूटीवर होते. यावेळी पोलीस नाईक किरण कोळपे हे देखील नाकाबंदीसाठी ड्यूटीवर होते.

गुरूवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सागर कदम हा त्याच्या ताब्यातील टँकरमध्ये (क्र. एमएच- 17 एजी- 5555) पाणी भरून नगर- मनमाड रोडवरून विरूद्ध दिशेने टँकर चालवित घेऊन गरवारे चौकात आला.

तो तेथे येताच पोलीस नाईक कोळपे यांनी त्याला टँकर मागे घेऊन जाण्याच्या सुचना केल्या. यावेळी कदम त्यांना म्हणाला, मी टँकर मागे घेणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करून कोळपे करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. तसेच, कोळपे यांच्या शर्टची कॉलर धरून त्यांना मारहाण केली.

कोळपे यांच्या फिर्यादीवरून कदम विरूद्ध भादंवि 353, 352, 332, 504, 506, मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या