Wednesday, April 24, 2024
Homeनगरटँकरच्या धडकेत तरुण ठार

टँकरच्या धडकेत तरुण ठार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

कॉलेजवरुन दुचाकीने घरी परतत असतांना मळीच्या टँकरने जोराची धडक दिल्याने विद्यार्थी रस्त्यावर पडला. टँकरचे (Tanker) चाक डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला. ही घटना कोल्हार-घोटी राज्य मार्गावर समनापूर शिवारात बुधवारी दुपारी घडली.

- Advertisement -

संगमनेरच्या टोळीकडून चोरलेल्या 51 मोटारसायकली हस्तगत

अनिकेत संजय गडगे (वय 17, रा. वडगावपान, ता. संगमनेर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. अनिकेत हा श्रमिक ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीत शिकत होता. बुधवारी कॉलेजमधून दुचाकीने घरी परतत असतांना समनापूर गावाजवळ टँकर क्रमांक एमएच 12 डी 7222 या टँकरने धडक (Tanker And Bike Accident) दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिर्डी मतदारसंघातील दहशतीचे झाकण उघडवाशौचालयाच्या आडोशाला बंद बरणीत आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक

- Advertisment -

ताज्या बातम्या