Video : ‘तान्‍हाजी : द लायन मराठा वॉरीयर’ नाशिकच्या तरुणाकडून थ्री डी गेमची निर्मिती

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

घराघरांत स्मार्टफोनची संख्या वाढली आहे. स्मार्टफोनचा वापर करत असलेली तरुणाई सध्या गेम भलतीच प्रेमात पडलेली दिसून येत आहे. पब जी नावाचा परदेशातील गेमची मोठी चर्चा झालेली आपल्या सर्वांना माहितीच आहे. केंद्र सरकारने चायनाच्या या गेमवर बंदी घातल्याने अनेक युजर्सचा हिरमोडदेखील झालेला बघायला मिळाला…

युद्धनितीचे मोबाईल गेम्‍स युवकांच्‍या पसंतीस उतरत असल्याचे हेरून गेमिंगचा आनंद देतांना आपल्‍या मराठमोळ्या योद्धांचे कर्तृत्त्व पोहोचविण्याच्‍या उद्देशाने आबराका डाबरा सॉफ्टवेअर सोल्‍यूशन प्रा. लि. या स्‍टार्टअपद्वारे “तान्‍हाजी : द लायन मराठा वॉरीयर” हा गेम लॉकडाऊन काळात तयार केला. अल्‍पावधीत या ॲपला चांगला प्रतिसाद या गेमला मिळालेला दिसून येत आहे.

नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्‍ला जिंकत छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या स्‍वराज्‍य स्‍थापनेच्‍या स्‍वप्‍नपूर्तीत हातभार लावला होता. त्‍यांची कामगिरी तरुणांमध्ये रंजक पद्धतीने पोहचवितांना गेमिंगचा आनंद घेण्याचे दुहेरी उद्देश साध्य करण्यासाठी आबराका डाबराचे संचालक वैभव महाजन यांनी विकसीत केले आहे.

१ जानेवारीला हा गेम प्‍ले स्‍टोअरवर उपलब्‍ध करून देण्यात आला. अवघ्या महिनाभारत १० हजार ते ५० हजाराच्या घरात हा गेम युजर्सनी डाऊनलोड केला आहे.

हा गेम तयार कसा झाला? किती कष्ट यासाठी घ्यावे लागले याविषयी सविस्तर चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी दिनेश सोनवणे यांनी.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *