Thursday, April 25, 2024
Homeनगरतांदूळवाडी सोसायटीत उपाध्यक्षांचे सह्यांचे अधिकार काढले

तांदूळवाडी सोसायटीत उपाध्यक्षांचे सह्यांचे अधिकार काढले

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या तांदुळवाडी विविध कार्यकारी सोसायटीत राजकीय घडामोडी होऊन

- Advertisement -

उपाध्यक्षांचे सह्यांचे अधिकार काढून सदस्यांना देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तांदुळवाडी सोसायटीत पंचवार्षिक निवडणुकीत दुरंगी लढत होऊन ग्रामविकास मंडळाचे 7 सदस्य व जय भवानी मंडळाचे 6 सदस्य निवडून आले होते. पैकी शरद पेरणे, सूर्यभान म्हसे, भास्कर पेरणे, रामकृष्ण धागुडे, सुखदेव खाटेकर, गोरक्षनाथ धसाळ, सौ.मंगल पेरणे, बाळासाहेब धसाळ, दादासाहेब पेरणे, शिवाजी खडके, अशोक भालेराव, गहिनीनाथ पेरणे, कलावती पेरणे हे सदस्य निवडून आले होते व बाळासाहेब पेरणे (निमंत्रित) केशव पेरणे (तज्ज्ञ), काशिनाथ धागुडे (तज्ज्ञ) यांच्या यापदी निवड करण्यात आली होती.

या सदस्यांमधून अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड ही रोटेशन पद्धतीने ठरली असल्याने दर 6 महिन्याला निवड करण्यात येते. त्यानुसार दि.16 जानेवारी रोजी अध्यक्षपदी रामकृष्ण पंढरीनाथ धागुडे यांची तर उपाध्यक्षपदी गहिनीनाथ पेरणे यांची निवड करण्यात आली.

या दरम्यानच्या काळात राजकीय उलथापालथ होऊन उपाध्यक्ष गहिनीनाथ पेरणे यांचे अधिकार काढून सदस्या सौ. मंगल पेरणे यांना देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. यापूर्वी गहिनीनाथ पेरणे यांना अध्यक्षपद दिले होते. त्यांना पुन्हा उपाध्यक्षपद दिले गेले.

गहिनीनाथ पेरणे यांना यापूर्वी सोसायटीचे अध्यक्षपद व कारखान्याचा ठराव देखील देण्यात आला होता. परंतु मंगल पेरणे यांना सदस्य मंडळाच्या बैठकीत उपाध्यक्षपद देण्याचे ठरविले असताना त्यांना डावलून पेरणे यांची निवड करण्यात आली. दरम्यान सदस्यांना विश्वासात न घेता ही निवड करण्यात आली. त्यामुळे उपाध्यक्षपदाच्या सह्यांचे अधिकार सदस्या मंगल पेरणे यांना देण्यात आले, अशी माहिती शरद पेरणे, दादासाहेब पेरणे, सूर्यभान म्हसे, बाळासाहेब धसाळ, अशोक भालेराव, रामकृष्ण धागुडे, बाळासाहेब पेरणे यांनी दै.सार्वमतशी बोलताना दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या