Friday, April 26, 2024
Homeनगरमदतीची नुसती घोषणाच...आम्हा तमाशा कलावंताच्या पदरात काहीच नाही

मदतीची नुसती घोषणाच…आम्हा तमाशा कलावंताच्या पदरात काहीच नाही

नांदुर्खी |वार्ताहर| Nadurkhi

केंद्र (Center) व राज्याने (State) राज्यातील सुमारे 1 लाख 52 हजार कलाकारांना (Artists) एक कोटी 12 लाख रुपयांचा मदतीचा निधीही मंजूर (Fund) करून अद्याप संबंधित कलाकारांचा जिल्हानिहाय तालुकानिहाय शासकीय कार्यालयात जमा न झाल्याने तमाशा कलावंताच्या (Tamasha Artist) पदरात अद्यापही निराशाच आहे. राज्यात सतेचा गाढा हाकत असताना आमच्या गोरगरिब तमाशा कलावंताच्या पदरात अद्याप काहीच नाय, आमची झोळी अजूनही रिकामीच आहे, अशी खंत प्रसिद्ध तमाशा कलावंत दिपाली सुरेखा पुणेकर (Deepali Surekha Punekar) यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

तमाशा कलावंताची (Tamasha Artist) आजची अवस्था फार बिकट झाली आहे. करोनामुळे (Corona) देशातील कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली होती. काही महिन्यांपासून करोनाचे निर्बंध (Corona Restrictions) पूर्णपणे माफ झाल्याने महाराष्ट्रातील अनेक गावातील देव देवतांच्या यात्रेचा महोत्सव साजरा होत असताना गावची यात्रा आली की गावात तमाशा येणारच हे ठरलेले आहे. मात्र आजच्या आधुनिक तमाशाच्या युगात तमाशातील रंगबाजी, वगनाट्य, लावणी आदी कलागुणांचा आजच्या तरुण पिढीला विसर पडला असून आधुनिक पद्धतीने तमाशाचे जणू काय आत्ता नाच गाण्यातच रूपांतर झाले आहे. आम्हा तमाशा कलावंताच्या लहानपणापासूनच पायात घुंगरू आणि ढोलकीच्या तालावर नाच गाणे करण्याची आवड असल्याने उपाशी राहू तरी तमाशा रसिकांची इच्छा पूर्ण करण्याची आमच्या हाडा मासातील कला आजही जिवंत आहे.

अनेक गावांत गेल्या काही महिन्यांपासून आम्ही सर्व तमाशा फडातील सोंगाड्या, मुख्य कलाकार, गायक तमाशाची हौस पुरवीत असताना गावातील यात्रा कमिटी मात्र म्हणावा तसा करोनाच्या महासंकटामुळे आर्थिक नुकसान झाल्याने मुबलक मोबदला देत नाहीत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी तमाशा मालकांच्या गाड्यांना महाराष्टात टोलनाका माफ करून त्याचबरोबर त्यांच्या वाहतूक करणार्‍या चार चाकी गाड्यांना कमी दरात सुविधा उपलब्ध करून देवू ही आश्वासने अद्यापही पूर्ण न झाल्याने इंधन दरवाढीच्या काळात आम्हा तमाशा कलाकारांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. याबाबत राज्याने आणि केंद्राने सकारात्मक निर्णय घ्यावा.

तमाशा महामंडळ (Tamasha Mahamandal) तमाशा कलावंत रसिक संच यांच्या माध्यमातून अनेक वेळा दिल्ली दरबारी मुंबई मंत्रालय या ठिकाणी उपोषण मोर्चे या माध्यमातून आंदोलने करून आमच्या मागण्या पूर्ण करून महाराष्टाची कला जिवंत ठेवणार्‍या कलाकारांना आर्थिक बाजूने सक्षम करा अशाही मागण्या वेळोवेळी शासन दरबारी केल्या मात्र अद्याप आम्हाला लाभ मिळाला नाही. आम्ही कलाकार अद्यापही उपाशीच आहेत.

खा. सुजय विखे, खा. सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा करावा

खा. सुजय विखे यांनी केंद्र सरकारच्या वयोवृद्ध अपंग जेष्ठ नागरिकांना अनेक शासकीय योजना मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. सुप्रिया सुळे या देखील अभ्यासू संसदपटू असल्याने आम्हा तमाशा कलाकारांच्या वेदनेची हाक केंद्र सरकारच्या कानावर घातली तर आमचा वनवास कमी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खा. विखे, खा. सुप्रिया सुळे यांनी याबाबत पाठपुरावा करावा, असे दीपाली सुरेखा पुणेकर यांनी बोलतांना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या