Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारतळोदा बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

तळोदा बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

बोरद । Bored। वार्ताहर

तळोदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Taloda Bazar Committee) निवडणुकीचा (election) बिगुल वाजला (bugle sounded) आणि ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा हिताची असलेली मार्केट कमिटीसंदर्भात गावागावात गप्पा रंगू लागल्यात ही मार्केट कमिटी बिनविरोध होईल की निवडणूक लागेल याकडे तालुक्याचे लक्ष लागले असुन सोसायटी मतदार संघ,ग्रामपंचायत मतदार संघ,व्यापारी मतदारसंघाचे व हमाल मापाडी मतदारसंघाचे मतदार राजा तयारीला लागला आहे.

- Advertisement -

तळोदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या बिगुल वाजला असुन सोसायटी मतदारसंघात एकूण 11 जागा तर ग्रामपंचायत मतदार संघात चार जागा, व्यापारी मतदारसंघात दोन जागा तर हमाल मापाडी मतदारसंघात एक जागा असे एकूण 18 जागांची निवडणूक होणार असून दि.27 मार्च 2023 पासून निवडणुकीत उभा राहणारा पात्र लाभार्थी यात पेपर भरतील तसेच शासनाचा नवीन धोरणाप्रमाणे जो शेतकरी असेल त्याचा सातबारा असेल त्या शेतकर्‍याला सुद्धा उभा राहता येईल असा शासन जीआर असून म्हणून पेपर भरणार्‍यांची गर्दी नक्की होईल असे सध्या चित्र आहे.

शेतकरी राजा पेपर भरेल पण त्याला मतदानाचा अधिकार नाही हा महाराष्ट्र शासनाने सहकार विभागाने काढलेला नवीन जीआर असून शेतकरी राजाला सुद्धा आपला पेपर या निवडणुकीत भरता येईल असा हा सुधारित कायदा असून शेतकर्‍यांचा हिताकरता असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचं संकट असल्याने या निवडणुका होऊ शकल्या नाहीत.

शासनाने आता नवीन आदेशाप्रमाणे निवडणुका जाहीर केल्या. ही निवडणूक बिनविरोध ही निवडणूक याकडे तालुका वासींयांचे लक्ष लागुन आहे.ु शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या बिगुल वाजवल्याने ग्रामीण भागातील सहकारी संस्थेतील तसेच ग्रामपंचायत मतदार संघातील व्यापारी मतदारसंघ हमाल मापारी मतदारसंघ या सर्वांचे लक्ष या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे लागुन आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या