Tuesday, April 23, 2024
Homeनंदुरबारवर्‍हाडाची गाडी खाईत; 29 जण जखमी

वर्‍हाडाची गाडी खाईत; 29 जण जखमी

सोमावल,Taloda – ता.तळोदा :

भगदरी येथून सोमावल येथे पीकअप गाडीने लग्नासाठी जाणार्‍या वर्‍हाडच्या गाडीचा चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट खाईत उतरली. यामुळे भांबाबलेल्या वर्‍हाडींनीखाली उडी मारल्यामुळे 29 जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

हा अपघात कोठार नजीक सकाळी एकरा वाजेचा सुमारास घडला.जखमींवर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील आठ जणाना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार.पीकअप गाडी( एम.एच.39,सी.9864) हिच्याने बबन शेमत्या वळवी यांचा मुलगा गोविंद याच्या लग्नासाठी ते नातेवाईकांसह भगदरी येथून सोमावल येथे आज दि.5 शनिवारी रोजी येत असताना सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कोठार गावाजवळ आश्रम शाळेजवळ पीक अपच्या गाडीच्या ताबा अचानक चालका कडून सुटला.

त्यामुळे गाडी खोल खाईत उतरली.साहजिकच भांबावलेल्या वर्‍हाडींनी गाडी मधून खाली उड्या मारल्या त्यामुळे ते खाली पडल्याने त्यांना हाता,पायाला जखमा झाल्या आहेत . यात 29 जणांना दुखापत झाली आहे.जखमिनीं एकच आरडा,ओरड केल्यामुळे कोठार गावातील नागरिक मदतीसाठी धावून आले होते.त्यांनी जखमींना खाईतून बाहेर काढले.यावेळी तळोदा पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे यांनी उपजिल्हा रुग्णालय व पोलिसांना कळविल्यानंतर रुग्ण वाहिकानी जखमींना उपचारासाठी तळोदा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांचा उपचार सुरू आहेत त्यातील आठ जणांना अधिक मार लागल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.याबाबत बबन शेमट्या वळवी रा सल्लीबार ता अक्कलकुवा याच्या फिर्यादीवरून चालक भिमसिंग गेज्या वसावे रा भगदरी ता. अक्कलकुवा याच्या विरोधात पोलिस ठाण्यात मोटार अपघाताच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या अपघातात वाण्या वसावे, बिजा वसावे, तेजाला वसावे, रुप्सिंग वसावे, तीज्या वसावे,दादला वसावे, रवींद्र वसावे, सोनी वसावे, ईश्वर वसावे,खाअल्या वसावे,मोत्या बुध्या वसावे, धरंसिंग वसावे,हातू वसावे,अशोक वसावे, फुळसिंग वसावे, कला पाडवी, शकीला वसावे, कागदा वसावे, ब्रिजला वसावे,चींगा वसावे, गणेश वसावे, दिलीप वसावे, तेजला पारशी वसावे, दिला वसावे,केरशी वसावे,केली वसावे,असरी वसावे हे जखमी झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या