Friday, April 26, 2024
Homeनगरपुलावरून दोन पलट्या घेत मालवाहू कंटेनर उलटला; पाहा व्हिडिओ

पुलावरून दोन पलट्या घेत मालवाहू कंटेनर उलटला; पाहा व्हिडिओ

तळेगाव दिघे | वार्ताहर

लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावरील संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजार तळानजीक असलेल्या धोकादायक अपघाती वळण रस्त्यावरील अरुंद पुलावरून दोन पलट्या खात मालवाहू कंटेनर थेट ओढ्यात उलटून अपघातग्रस्त झाला.

- Advertisement -

या अपघातात चालक मधुकर कांबळे हवे किरकोळ जखमी झाले. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर ही अपघाताची घटना घडली. अपघातांचा सिलसिला सुरु असलेल्या सदर अरुंद अपघाती पुलावर साक्षात मृत्यू घोंगावत आहे.

लोणी ते नांदूरशिंगोटे या तळेगाव दिघेमार्गे असलेल्या डांबरी रस्त्याने चालक मधुकर कांबळे हे मालवाहू कंटेनरमध्ये ( टीएस १५ युए ००४५ ) पेपर घेवून बिदर (कर्नाटक) येथून सिल्वासाच्या (गुजरात) दिशेने प्रवास करीत होते. भरधाव वेगाने जाणारा कंटेनर तळेगाव दिघे बाजार तळानजीकच्या अरुंद पुलावरून तीन पलट्या खात उलटून ओढ्यात अपघातग्रस्त झाला. अपघातातून चालक मधुकर कांबळे हे किरकोळ मार लागत बचावले.

मालवाहू कंटेनर उलटला त्याच दरम्यान समोरून पुलावरून चारचाकी अथवा दुचाकी वाहन अथवा पादचारी येत नव्हते, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच छत्रपती प्रतिष्ठानहे कार्याध्यक्ष सचिनभाऊ दिघे, सुनील दिघे, बी. सी. दिघे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

नजीकच सुनील दिघे यांचे साईश एजन्सी हे इलेक्ट्रानिक दुकान आहे. सदर दुकानाच्या गोडावूनसमोर लावलेल्या सीसीटीव्हीत अपघाताच्या घटनेचे चित्रिकरण झाले. या अपघातात मालवाहू कंटेनरचे मोठे नुकसान झाले. बाजार तळानजीकच्या अपघाती वळण रस्त्याचे व अपघाती अरुंद पुलाचे त्वरित रुंदीकरण करावे, अशी मागणी छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे व बी. सी. दिघे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या