Friday, April 26, 2024
Homeनगरटाकळीमिया सोसायटी; 13 जागेसाठी 23 उमेदवारी अर्ज दाखल

टाकळीमिया सोसायटी; 13 जागेसाठी 23 उमेदवारी अर्ज दाखल

टाकळीमिया |वार्ताहर| Takalibhan

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू असून एकूण 13 जागेसाठी 23 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर 2 जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

दि.23 मार्च ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. तर 24 मार्च रोजी अर्जाची छाननी होती. या छाननीमध्ये सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. या सोसायटीत सर्वसाधारणच्या 8 जागा असून यासाठी 13 जणांचे अर्ज दाखल झाले. यात सुरेश मोहनीराज करपे, रमेश रामचंद्र निमसे, सुभाष नामदेव करपे, अशोक तुकाराम मोरे, सचिन गोरक्षनाथ शिंदे, रावसाहेब सीताराम चोथे, अरविंद रंगनाथ चोथे, अजित संभाजी करपे, सुभाष भास्कर जुंदरे, शिवशंकर मुरलीधर करपे, राहुल विष्णु जाधव, गणेश पाराजी शिंदे, मारूती किसन निमसे यांचा समावेश आहे.

महिला राखीवच्या 2 जागा असून यासाठी 5 अर्ज दाखल झाले आहेत. यात ताराबाई शिवनाथ करपे, छाया गोरक्षनाथ निमसे, ताराबाई रमेश तोडमल, लता पाराजी शिंदे, कांताबाई रावसाहेब निमसे, इतर मागास वर्ग (ओबीसी) ची 1 जागा असून यासाठी 3 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यात शिवाजी नाना भवाळ, राहुल विष्णु जाधव, अजित संभाजी करपे यांचा समावेश आहे. अनुसूचित जातीसाठी 1 जागा असून यासाठी गीतांजली सुनील सगळगिळे यांचा अर्ज दाखल आहे. तर भटक्या विमुक्त जाती यासाठी 1 जागा असून यासाठी पद्माकर दत्तात्रय गोसावी यांचा अर्ज दाखल आहे. भटक्या विमुक्त जाती व अनुसूचित जाती यासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने या दोन्ही जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोन्ही जागा सत्तारूढ गटाच्या आहेत.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी 25 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत मुदत असून यानंतर निवडणुकीचे चित्र समोर येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुरीचे सहाय्यक निबंधक डी. सी. नागरगोजे हे काम पहात आहेत. त्यांना सहायक म्हणून मुख्य सचिव बाळासाहेब माळवदे व मच्छिंद्र कोळसे हे काम पहात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या