Saturday, April 27, 2024
Homeनगरटाकळीमानूर सोसायटी निवडणुकीत भाजप - सेनेची युती

टाकळीमानूर सोसायटी निवडणुकीत भाजप – सेनेची युती

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. असे असले तरी पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांत सेवा संस्था निवडणुकीत भाजप, शिवसेनेची युती झालेली दिसत आहे. तालुक्यातील पूर्व भागातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची समजली जाणार्‍या टाकळीमानूर सेवा संस्था निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या नेत्यांनी युती करून ही निवडणूक लढवायची ठरवली आहे.

- Advertisement -

यासाठी आज शहाशरीफ बाबा शेतकरी ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून तेरा जागांसाठी एकूण एकवीस अर्ज दाखल करण्यात आले आहेत. टाकळीमानूर सेवा संस्था ग्रुप सोसायटी असून यामध्ये तिनखडी, गाडेवाडी,मंचरवाडी,तांबेवाडी आणि अंबिकानगर यांचा समावेश आहे.एकूण 859 सभासद मतदार आहेत. एकाच पॅनलकडून एकवीस अर्ज दाखल केले असून शहाशरीफ बाबा शेतकरी ग्राम विकास पॅनलचे नेतृत्व भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर,शिवसेनेचे शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे संघटक भगवान दराडे, आमदार मोनिका राजळे यांचे कट्टर समर्थक व उपसरपंच शुभम गाडे, डॉ.विजय कसबे, नानासाहेब गाडे, विजयकुमार मंडलेचा करत आहेत.

अर्ज दाखल करताना रावसाहेब पवार, बबन खेडकर, रामचंद्र सानप, सोमनाथ दराडे, रंजीत काळे, कृष्णा गाडे, आदिनाथ जगताप, माणिक शिंदे, घनश्याम ढोले, बाळासाहेब कांजवणे, दिलीप उगले, तुकाराम खेडकर, गणेश कारंडे उपस्थित होते. अर्ज भरण्याची शेवटची मुदत 12 मे असून 10 जून रोजी मतदान होणार आहे.सध्या सेवा संस्थेमध्ये शहाशरीफ बाबा शेतकरी ग्राम विकास पॅनलची सत्ता आहे.

विरोधक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काय भूमिका घेतात याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत असे यावेळी उपसरपंच शुभम गाडे यांनी सांगितले.तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही संयुक्तपणे लढवत आहोत असे भगवान दराडे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या