Friday, April 26, 2024
Homeनगरटाकळीभानच्या उपबाजारात कांद्याला 1600 रुपये भाव

टाकळीभानच्या उपबाजारात कांद्याला 1600 रुपये भाव

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारात कांदा काहीसा वधारला आहे. काल येथे कांद्याला 1150 ते 1600 रुपये भाव निघाला.

- Advertisement -

आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार दोन दिवस कांदा बाजार होतो. काल शुक्रवारी 3186 कांदा गोण्याची आवक उपबाजार आवारात झाली होती. यावेळी कांद्याचा दर काहीसा वधारलेला दिसुन आला. एक नंबर कांद्याला 1150 ते 1600 रुपये, दोन नंबरला 650 ते 1050 रुपये, तीन नंबरला 250 ते 550 रुपये तर गोल्टी कांद्याला 400 ते 800 रुपयांचा दर मिळाला. गेले काही दिवस दर एक हजारापर्यंत स्थिर असल्याने आवक मंदावली होती.

परीसरातील व गोदावरी पट्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी येथील उपबाजार फायद्याचा असल्याने या उपबाजारला महत्व प्राप्त झालेले आहे. हा उपबाजार शेतकर्‍यांच्यादृष्टीने फायद्याचा ठरत असल्याने परीसरातील शेतकर्‍यांनी आपला कांदा टाकळीभान उपबाजारात विक्रिसाठी आणावा, असे आवाहन संस्थेचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्षे, सचिव किशोर काळे, उपबाजार व्यवस्थापक दिनकर पवार यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या