Thursday, April 25, 2024
Homeनगरटाकळीमानुरला दहावी परिक्षा केंद्रे ताब्यात घेण्याचा प्रयत्न

टाकळीमानुरला दहावी परिक्षा केंद्रे ताब्यात घेण्याचा प्रयत्न

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील टाकळीमानुर येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कॉपी पुरवणार्‍या जमावा कडून लाठ्या-काठ्या घेवून भरारी पथकावर दगडफेक करत परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये भरारी पथकातील पंचायत समितीचे अभियंता रामेश्वर शिवणकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

नगरमध्ये इन्फ्लूएंझाचा पहिला बळी

याबाबत समजलेली हकीकत अशी की, बुधवारी (दि.15) दुपारी साडेबारा वाजता टाकळीमानुर येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयात दहावीचा भूमिती विषयाचा पेपर सुरू होता. या परिक्षेला 217 विद्यार्थ्यी असले होते. यावेळी परीक्षार्थींना कॉफी पुरवणार्‍या जमावाणे परीक्षा केंद्रात बळजबरी प्रवेश करत भरारी पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांना धमकावून परीक्षार्थींना कॉपी करण्यास मुभा देण्याची मागणी केली. यावर भरारी पथक प्रमुख गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी कॉपी पुरविणार्‍या इसमांना परीक्षा केंद्राच्या बाहेर जाण्यास सुचवली मात्र या गोष्टीचा राग येऊन जमावाने परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर लाठ्या-काठ्या, दगड, गोटे यांच्या सहाय्याने जोरदार हल्ला केला.

नूतन अध्यक्ष कर्डिलेंकडून 700 पदभरतीची घोषणा

यावेळी झालेल्या दगड फेकीत भरारी पथकातील रामेश्वर शिवणकर यांच्या चेहर्‍यावर दगड लागून ते गंभीर जखमी झाले आहेत.परीक्षा केंद्रावरील पोलीस कर्मचार्‍यांनी भरारी पथकातील कर्मचार्‍यांना या हल्ल्यातून वाचवले, मात्र झालेल्या दगडफेकीत गटविकास अधिकारी जगदीश पालवे हे देखील किरकोळ जखमी झाले आहेत. भरारी पथकातील जखमी कर्मचारी रामेश्वर शिवणकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना टाकळीमानुर येथून पुढील उपचारासाठी तात्काळ पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

बाभुळवंडी येथे बहीण-भावाचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू

यापूर्वी देखील कॉपी पुरवणार्‍या हल्लेखोरांनी गणिताच्या पेपरला कॉपी विरोधी पथकातील महिला अधिकारी व कर्मचार्‍यांना दमदाटी करून परीक्षार्थीना कॉपी पुरवल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायदे यांनी घटना ठिकाणी भेट दिली असून सरकारी कामात अडथळा आणून सरकारी कर्मचार्‍यांना जखमी केल्या बाबत कायदेशीर फिर्याद दाखल करण्याच्या हालचाली उशिरापर्यंत सुरू होत्या. या घटनेची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून यापुढील कालावधीत या परीक्षा केंद्रावर वरिष्ठ दर्जाचे भरारी पथक बसून राहणार असल्याची माहिती समजत आहे.

कॉलेजच्या गेटमध्ये दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

- Advertisment -

ताज्या बातम्या