Friday, April 26, 2024
Homeनगरटाकळीभान येथे लुज कांदा लिलावाला प्रतिसाद

टाकळीभान येथे लुज कांदा लिलावाला प्रतिसाद

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Shrirampur Market Committee) टाकळीभान उपबाजारात (Takalibhan Sub Market) लुज कांदा लिलाव (Onion Auction) सुरु करण्याच्या बाजार समितीच्या निर्णयाला कांदा उत्पादक (Onion Grower) शेतकर्‍यांनी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद दिला. गोणी कांदा लिलावाच्या तुलनेत लुज कांद्याला चांगला दर मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

- Advertisement -

ग्रामविकास अधिकार्‍याला धक्काबुक्की, एका विरुद्ध गुन्हा

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Shrirampur Market Committee) आवारात गेल्या सात ते आठ वर्षांपासून गोणीतील कांदा लिलाव बाजार सुरु आहे. मात्र गेल्या वर्षापासून लुज कांदा (Onion) खरेदी सुरु करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडुन केली जात होती. अखेर बाजार समिती प्रशासनाने निर्णय घेऊन गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर लुज कांदा खरेदीचा शुभारंभ करुन आठवड्यातील शनिवार व रविवार दोन दिवस लुज कांदा लिलाव सुरु केला आहे तर आठवड्यातील शुक्रवार व मंगळवार दोन दिवस नेहमीप्रमाणे गोणीतील कांदा लिलाव (Onion Auction) बाजार सुरु रहाणार आहे.

पुढील आठवड्यापासून झेडपीच्या शाळा सकाळी भरणार?

शनिवारी लुज कांदा लिलाव (Onion Auction) बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. सुमारे 107 साधनाने कांदा लिलावास सकाळच्या सत्रात हजेरी लावली होती. यावेळी 660 ते 1 हजार 50 रुपयाचा दर लुज कांद्याला मिळाला. लुज कांद्याला (Onion) असा दर मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा खर्च कमी होणार असल्याने गोणीतील सध्याच्या कांदा दरातील तुलनेत समाधानकारक दर मिळाल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले, शनिवारी सायंकाळीही लुज कांद्याची खरेदी सुरु होती.

महापशुधन एक्सपोत १२ कोटीचा रेडा, ५१ लाखांचा घोडा अन् दीड फूट उंचीची मेंढी!

यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, माजी सरपंच चित्रसेन रणनवरे, बाजार समितीचे सचिव साहेबराव वाबळे, उपबाजार व्यवस्थापक दिनकर पवार, अविनाश लोखंडे, श्रीरामपूर व टाकळीभान बाजार समितीचे सर्व कर्मचारी, सर्व व्यापारी व कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या