Friday, April 26, 2024
Homeनगरटाकळीभान-नेवासा रस्ता कामाची गुणवत्ता तपासणी करा

टाकळीभान-नेवासा रस्ता कामाची गुणवत्ता तपासणी करा

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

नेवासा ते टाकळीभान रस्ता काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्यामुळे संबंधित सुरू असलेले काम अंदाज पत्रकाप्रमाणे होऊन सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता तपासणी करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी नेवासाफाटा येथील आंबेडकर चौकात आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष राजू आघाव व अ‍ॅड. सादिक शिलेदार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी तालुकाध्यक्ष राजू आघाव म्हणाले की, शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून बांधकाम खात्याचे या रस्ता कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे संबंधित ठेकेदार निकृष्ट काम करत असून एका कि.मी. अंतराला अडीच कोटी रुपये खर्च होऊनही या कामाची गुणवत्ता नसल्यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे. हे काम अंदाज पत्रकाप्रमाणे होत नसल्यामुळे बांधकाम खात्यावर आघाव यांनी कडाडून टीका केली.

अ‍ॅड.शिलेदार यांनी कामाचे अंदाजपत्रक आणि सुरू असलेल्या कामाचा लेखाजोखा अधिकार्‍यांसमोर मांडला.काम अंदाज पत्रकाप्रमाणे न झाल्यास प्रसंगी न्यायालयातही दाद मागण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

तालुका उपाध्यक्ष देवराम सरोदे यावेळी म्हणाले, सध्या या रस्ता कामाकडे अर्थिक मिली-भगतमुळे दुर्लक्ष झाल्याने रस्ता कामाची वाट लागलेली आहे.

या रास्ता रोकोचे निवेदन बांधकाम खात्याचे अभियंता श्री. दुबाळे यांनी स्विकारून या कामाची गुणवत्ता तपासणीसाठी पाठपुरावा करू व सुरू असलेले काम दर्जेदार होण्यासाठी बांधकाम विभाग लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले.

रास्ता रोकोप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, हवालदार बाळकृष्ण ठोंबरे, कॉन्स्टेबल सुहास गायकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार किरण गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. याप्रसंगी घटनापती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवि भालेराव, आम आदमीचे सचिव प्रविण तिरोडकर, भाऊसाहेब बेल्हेकर, अप्पासाहेब लोंढे, अल्पसंख्याक आघाडी प्रमुख सलीम सय्यद, शहराध्यक्ष संदीप आलवणे, बापूसाहेब आढागळे, नानासाहेब बर्डे, डॅनियल जावळे, संतोष कापसे, पांडुरंग खंडागळे, नितीन गुंजाळ, युवक आघाडी प्रमुख दीपक गायकवाड, सोहेल शेख आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या