Friday, April 26, 2024
Homeनगरटाकळी ढोकेश्वर येथील बँकेतील डिमांड ड्राफ्टद्वारे 5 कोटींची फसवणूक

टाकळी ढोकेश्वर येथील बँकेतील डिमांड ड्राफ्टद्वारे 5 कोटींची फसवणूक

पारनेर |तालुका प्रतिनिधी|parner

पुणे जिल्ह्यातील वाघोली याठिकाणी जागेच्या व्यवहारापोटी भुवनेशकुमार साल व विशाल चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे हनुमंत अलवर स्थल ट्रस्टच्या नावे पाच कोटी रुपयांचा काढण्यात आलेला धनादेश बँक अधिकार्‍यांच्या बनावट सह्या करून वटविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे याप्रकरणी आपली फसवणूक झाली.

- Advertisement -

असल्याची फिर्याद किरण लक्ष्मण आहेर (वय 37, रा. आणे, तालुका जुन्नर) यांनी दिली आहे. उत्तर प्रदेश येथील आरोपी भुवनेश्वर कुमार साल (रा. चंदिगड), अ‍ॅड. अजय सिंग (रा. चंदिगड), विशाल चव्हाण (राहणार दिल्ली), अशोक भोपालसिंग चौधरी, जिमी अशोक चौधरी, (दोघेही रा. उत्तर प्रदेश) या 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर फसवणुकीचा गुन्हा हा 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान घडला असून फिर्यादीने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर पारनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील वाघोली याठिकाणी ट्रस्टच्या जागेच्या व्यवहारापोटी या घटनेतील भुवनेश्वरकुमार साल, अ‍ॅड. अजय सिंग, विशाल चव्हाण, अशोक भोपालसिंग चौधरी, जिमी अशोक चौधरी या आरोपींनी यातील फिर्यादी किरण आहेर यांच्या टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे खाते क्रमांक 31261808157 मधून वाघोली जिल्हा पुणे येथील खरेदी करावयाच्या जागेच्या व्यवहारापोटी भुवनेश कुमार साल व विशाल चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे हनुमंत अलवर स्थल ट्रस्टच्या नावे 5 कोटी रुपयाचा काढण्यात आलेला डिमांड ड्राफ्ट क्रमांक शहर 466679 स्कॅन छायांकित प्रत ही फिर्यादी यांनी अ‍ॅड. अजय यांचे ई-मेलवर पाठविण्यात आलेली असताना ती अजयसिंह व भुवनेश्वर साल व विशाल चव्हाण व हनुमत अलवर दव्य स्थल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक भोपालसिंग चौधरी व जेमी अशोक चौधरी यांनी संगनमताने फिर्यादीची फसवणूक व्हावी.

या हेतूने या डिमांड ड्राफ्टची बनावट प्रत तयार करून त्याच्यावर बँकेचे अधिकारी यांच्याही बनावट सह्या करून डिमांड ड्राफ्ट क्रमांक 466679 हा दि. 15 फेब्रुवारी 2020 रोजी आयडीबीआय बँक बिजनोर सिटी राज्य उत्तर प्रदेश येथील खाते क्रमांक 024 6102000008341 यामध्ये फिर्यादीच्या संमतीशिवाय व दोन फिर्यादीची फसवणूक करून 5 कोटी रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्यावतीने उच्च न्यायालयात एन. बी. नरवडे यांनी काम पाहिले. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या