Saturday, April 27, 2024
Homeनगरदानशूर व्यक्तींनी कोविड केअर सेंटरला मदत करावी - तहसीलदार सुराणा

दानशूर व्यक्तींनी कोविड केअर सेंटरला मदत करावी – तहसीलदार सुराणा

नेवासा lतालुका प्रतिनिधीl Newasa

करोनाचे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोविड केअर सेंटर मधील सुविधेवर मर्यादा येत आहे.

- Advertisement -

बेड, गॅस डिलेंडर, मास्क, सॅनिटायझर या सारख्या वस्तूंची गरज भासत असल्याने दानशूर व्यक्तींनी शासकीय कोविड केअर सेंटर मधील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी

दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले.

भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा भक्तनिवासामध्ये सुरू असलेल्या शासकीय कोविड केअर सेंटर करिता पंचगंगा सिड्सने 100 बेड्सची देणगी दिली. पंचगंगा सिड्सचे संचालक काकासाहेब उत्तमराव शिंदे यांनी भेंडा येथे तहसीलदार श्री.सुराणा यांचे कडे 100 बेड्स सुपूर्द केले.

यावेळी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी, कुकाणा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ.भाग्यश्री-सारूक-कीर्तने, डॉ.योगेश साळुंके, बाजार समितीचे सभापती डॉ शिवाजी शिंदे, डॉ.कोलते, किशोर मिसाळ, सुभाष महाशिकारे, राजेंद्र चिंधे, नंदू गव्हाणे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना तहसीलदार सुराणा म्हणाले,भेंडा कोविड केअर सेंटर मध्ये आज अखेर 162 रुग्ण ऍडमिट आहेत. काही रुग्णांना कॉट-गादी (बेड) शिल्लक नव्हते. हि अडचण ओळखून उद्योजक श्री. शिंदे यांनी 100 बेड्स दिले आहेत.

त्यामुळे येथील एकूण बेड संख्या 250 झाली आहे.अजून 250 बेड्सची आवश्यकता आहे.तसेच गॅस सिलेंडर, मास्क, सॅनिटायझरची सुद्धा आवश्यकता आहे. तालुक्यात रुग्णवाहिका ही कमी पडत आहेत. कोणी प्रायोजक असेल ते 2 रुग्णवाहिकांची मदत करावी. रोख रक्कम न देता दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन वस्तू रूपाने मदत करावी असे आवाहन ही श्री. सुराणा यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या