Saturday, April 27, 2024
Homeनगरतहसीलदार कुंदन हिरे सर्वोत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी

तहसीलदार कुंदन हिरे सर्वोत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून येथील तहसीलदार कुंदन हिरे यांची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी निवड केली. त्याबद्दल गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी तहसीलदार कुंदन हिरे यांचा सत्कार केला.

- Advertisement -

सत्कारास उत्तर देताना श्री. हिरे म्हणाले, बीएलओंना मतदार नोंदणी बाबतचे महत्व पटवून दिल्यानंतर कामाची गती वाढली. काम करण्यास अगोदर असमर्थता दर्शविल्यानंतर सर्व बीएलओंना मतदार नोंदणी चे महत्व पटवून देण्यात आले. त्यांनतर सर्वंकष अशी नोंदणी करता आली. या सर्व कामांचे श्रेय सर्व बीएलओंना जाते. प्राथमिक शिक्षकांसह नगरपालिकेचे कर्मचारी आणि इतरांचे त्यात खूप मोठे योगदान आहे.

कार्यक्रमास राहाता पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. वर्पे गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या