Friday, April 26, 2024
Homeनगरआ. लंके धावले अण्णांकडे तर उपसभापतींनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष

आ. लंके धावले अण्णांकडे तर उपसभापतींनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष

एक तास चर्चा : देवरेंची प्रकरणे घातली कानावर

पारनेर/ सुपा |प्रतिनिधी| Parner

- Advertisement -

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांच्या विरोधात 6 पानी अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांकडे (Nashik Divisional Commissioner0 पाठविलेला असून देवरे यांच्या भ्रष्टाचारांची प्रकरणे (Cases of corruption) आ.निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांच्यापुढे मांडली, असे त्यांच्या समर्थकांनी सांगीतले.

पारनेरच्या तहसीलदार देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांची ऑडिओ क्लीप (Audio Clip) शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल (Socila Media Viral) झाली. त्यामुळे तालुक्यासह राज्यात एकच खळबळ उडाली. त्यात पारनेरचे आ. लंके (MLA Nilesh Lanke) व महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांवर आरोप करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आ. लंके यांनी शनिवारी सकाळी राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक हजारे (Anna Hajare) यांची भेट घेतली. यावेळी आ. लंके यांनी हजारे यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Jyoti Devare) यांनी नाशिक विभागीय आयुक्तांना देवरे यांच्याबाबत सादर केलेल्या अहवालाची प्रत दाखवत सविस्तर चर्चा केली. तहसिलदार देवरे यांनी तालुक्यात काम करत असताना सामान्य जनतेची पिळवणूक करत भ्रष्टाचार केला, अशी माहिती त्यांनी दिली. अन्य जिल्ह्यांमध्ये तहसिलदार म्हणून काम करताना त्यांचे काम कसे होते याबाबतची माहिती लंके (MLA Nilesh Lanke) यांनी यावेळी हजारे यांना दिल्याचा दावा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, माजी सरपंच जयसिंग मापारी, निलेश लंके प्रतिष्ठानचे कारभारी पोटघन, दत्ता आवारी आदी उपस्थित होते.

वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा : हजारे

तहसीलदार देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यासबंधीच्या बातम्या टीव्हीवर पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा केली आहे. अशा गोष्टींमुळे तालुक्याची बदनामी होत आहे. त्यामुळे असे अधिकारी तालुक्याला नको. वेळ पडली तरी मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करील, असे हजारे यावेळी म्हणाले, असा दावा केला जात आहे.

चौकशीसाठी समिती

तहसीलदार देवेरे यांच्या ऑडिओ क्लिपनंतर राज्य महिला आयोगाने शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांना याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी देवेरे यांना होत असलेल्या त्रासाची चौकशी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी (पुर्नवसन विभाग) पल्लवी निर्मल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. यात उपजिल्हाधिकारी महसूल उर्मिला पाटील आणि सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदार वैशाली आव्हाड या सदस्या आहेत.

वरिष्ठ महिला सचिवांमार्फत चौकशी व्हावी

पुणे | Pune

पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या व्हायरल ऑडिओ क्लीपची दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर देवरे यांच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिले आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशीअंती वस्तूस्थिती समोर येईल. महसूल प्रशासनातील अधिकार्‍यांशीही चर्चा केल्याचे त्यांनी सांगीतले.

पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांची आत्महत्येच्या विचाराबाबत क्लीप व्हायरल झाल्यानंतर ना.डॉ. गोर्‍हे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. वरिष्ठ महिला सचिवांतर्फे या घटनेची चौकशी व्हावी, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

देवरे यांच्यासंदर्भात विभागीय आयुक्तस्तरावर लक्ष घालण्यात आलेले आहे, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगीतले. तर महिला अधिकार्‍यांमार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती नगर जिल्हाधिकार्‍यांनी दिली. या विषयांमध्ये मार्ग काढण्यासाठी ना.डॉ.गोर्‍हे प्रयत्न करणार आहेत. चौकशीत तपशिलाची अपेक्षा असेल असे डॉ.गोर्‍हे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या