Friday, April 26, 2024
Homeनगरतहसील व पंचायत समिती इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसवा - ना. काळे

तहसील व पंचायत समिती इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसवा – ना. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणार्‍या तहसील कार्यालय व पंचायत समिती इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसवा, अशी मागणी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून केली.

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचा पंचायत समिती व तहसील कार्यालयात विविध कामानिनित्त नेहमी वर्दळ असते. या दोनही कार्यालयांना महिन्याकाठी मोठ्या स्वरुपात वीजबिल येते. दिवसेंदिवस या वीज बिलामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महसूल व ग्राम विकास विभागाचा वीज बिलापोटी मोठा आर्थिक खर्च होत आहे.

तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसविल्यास निश्चितच हा आर्थिक खर्च कमी होण्यास मदत होवून त्यातून वाचणारी रक्कम इतर सोयीसुविधांसाठी वापरली जाईल. यासाठी तहसील कार्यालय व पंचायत समितीवर इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसवावे अशी मागणी ना. काळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे ना. काळे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या