Friday, April 26, 2024
Homeनाशिकतडीपार सराईतास इंदिरानगर पोलिसांकडून बेड्या

तडीपार सराईतास इंदिरानगर पोलिसांकडून बेड्या

नाशिक । प्रतिनिधी

वडाळा गावातून सिनेस्टाईल पाठलाग करून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तडीपार सराईत शौकत सुपडू शहा यास मंगळवारी (दि22) रात्री जेरबंद केले आहे.

- Advertisement -

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने दहा सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहून गुन्हेगारी वाढू नये म्हणून तडीपार गुन्हेगारांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.

सदर गुन्हेगार राहता घरी किंवा हद्दीत येऊन काही गुन्हेगारीत करत नाही याची तपासणी सुरू करण्यात आली आहे त्यानुसार मंगळवारी (दि. 22) रात्री साडेबाराच्या सुमारास गुन्हे शोध पथकाचे दत्तात्रेय पाळदे, अखलाक शेख ,जावेद खान, हे वडाळा गावातील शंभर फुटी रस्ता वरून गस्त घालत होते.

त्यावेळी घरकुल योजना इमारतीच्या जवळ एक इसम त्यांची गाडी पाहून पळू लागला तातडीने गुन्हे शोध पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास जेरबंद केले.

तो तडीपार सराईत गुन्हेगार शौकत सुपडू शहा (21 रा. वडाळा गाव सादिक नगर गल्ली नंबर 1) असल्याचे निदर्शनात आले.

त्याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले असून तो कोणतीही परवानगी न घेता आढळून आल्याने अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या