Wednesday, April 24, 2024
Homeनगरआणखी एक तडीपार आरोपी नगरमध्ये जेरबंद

आणखी एक तडीपार आरोपी नगरमध्ये जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एका तडीपार आरोपीला ताब्यात घेतले. रियाज ऊर्फ तात्या मुस्ताफ सय्यद (वय 35, रा. जुनाबाजार, बारातोटी कारंजाजवळ, नगर) असे त्याचे नाव आहे. त्याला जानेवारीपासून तडीपार करण्यात आले होते.

- Advertisement -

जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना तपासून ते हद्दपारीच्या आदेशाचा भंग करुन जिल्ह्यामध्ये बेकायदेशिररित्या वास्तव्य करत असल्यास कारवाई करण्याचे आदेश नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी दिले आहेत. त्यानुसार नगर शहरात आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

शनिवारी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एका तडीपार आरोपीला ताब्यात घेतले. रियाज ऊर्फ तात्या मुस्ताफ सय्यद (वय 35, रा. जुनाबाजार, बारातोटी कारंजाजवळ, नगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या हद्दपारीच्या आदेशाबाबत खात्री केली असता नगरच्या उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी त्याला 21 जानेवारीपासून एक वर्षाच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे.

तरीही तो या आदेशाचा भंग करुन बेकायदेशिररित्या शहरामध्ये वास्तव्य करत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे पुढील कार्यवाहीसाठी त्याला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या