Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक रोड परिसरात तलवारीसह कोयता जप्त

नाशिक रोड परिसरात तलवारीसह कोयता जप्त

ना.रोड । Nashik Road (प्रतिनिधी)

गुन्हे शाखेच्या सेवकांनी नाशिकरोड परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघा संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दोन तलवारी, एक खंजीर कोयता असे शस्त्र जप्त करण्यात आले असून या दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

गुन्हे शाखेचे सेवक देव किसन गायकर हे सिन्नरफाटा येथील पादचारी पुलाजवळ गस्तीवर असताना संजूसिंह सूरजसिंह सिकलकर या इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे एक तलवार व खंजीर आढळला. सदर आरोपीला अटक करून नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तर दुसर्‍या एका घटनेत गुन्हे शाखेचे विशाल वाघ हे नाशिक-पुणे महामार्गावरील आंबेडकरवाडी येथे मारुती मंदिराजवळ उभे असताना त्यांनी संशयित चेतन सुभाष गडवे याच्या ताब्यात असलेली इंडिका कारची (एम.एच. 04 डीजे 4306) झडती घेतली असता गाडीमध्ये तलवार व कोयता मिळून आला.

गडवे यास अटक करण्यात आली असून उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास उपनगर पोलीस करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या