Friday, April 26, 2024
Homeनगरतलवार बाळगणारा आरोपी जेरबंद

तलवार बाळगणारा आरोपी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील सारोळा बध्दी गावच्या शिवारात नगर ते जामखेड रोडवरील विश्वभारती इंजिनियरींग कॉलेजच्या पुढे नवीन बायपास ब्रिझच्या खाली हातामध्ये तलवार दहशत करणार्‍या व्यक्तीवर नगर तालुका पोलीसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी अवैध शस्त्र बाळगण्यावर, विक्री करण्यार्‍यावर कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरिक्षक युवराज चव्हाण, रणजित मराग, हवालदार सुभाष थोरात, कमलेश पाथरुट, संभाजी बोराडे, राजू खेडकर, विशाल टकले असे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक केले होते. हे पथक नगर तालुक्यात पेट्रोलींग करीत असतांना सहायक पोलीस निरिक्षक चव्हाण यांना बातमी मिळाली, सारोळा बध्दी गावच्या शिवारात जामखेड रोडवरील विश्वभारती इंजिनियरींग कॉलेजच्या पुढे नवीन बायपास ब्रिझच्या खाली एक इसम त्याच्या हातामध्ये तलवार विक्री करण्याच्या उद्देशाने थांबलेला आहे.

त्यानुसार सारोळा बध्दी गावच्या शिवारामध्ये जामखेड रोडवर नवीन झालेल्या ब्रीझच्या खाली जावून पाहणी केली असता तेथे एक इसम हातात तलवार घेवून विक्री करण्याच्या उद्देशाने थांबलेला दिसला. त्यानंतर पोलीसांची चाहुल लागल्यानंतर पळून जावू लागला. मात्र, पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे तलवार मिळून आली. यावेळी आरोपीने स्वत:चे नाव अजय बेरड (वय 24 वर्षे रा. दरेवाडी नगर) असे सांगितले. तालुका पोलीसांनी आरोपी बेरडला ताब्यात घेवून त्याच्या विरोधात कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या