Friday, April 26, 2024
Homeनगरपोहण्यासाठी गेलेला 12 वर्षीय मुलगा प्रवरेत बुडाला

पोहण्यासाठी गेलेला 12 वर्षीय मुलगा प्रवरेत बुडाला

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

पोहण्यासाठी गेलेल्या पाच बालकांपैकी एकजण संगमनेर खुर्द येथील प्रवरानदीपात्रात बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास प्रवरानदीच्या पुलाजवळ घडली.

- Advertisement -

यश कृष्णा आडेप (वय 12, रा. पदमानगर) हा आपल्या चार मित्रांसह काल दुपारी प्रवरानदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. दुपारी 4 वाजेच्या सुमारास सर्व मुले प्रवरा नदीच्या पुलाजवळील पात्रात पोहत होते.

यातील यश आडेप हा अचानक पाण्यात बुडाला. तो पाण्यात बुडाल्याचे समजताच इतर मुलांनी आरडाओरड केली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या ऋषिकेश रमेश मोहन याने यश याला वाचविण्याचा प्रयत्न केला. प्रवरा पात्रात पाणी जास्त असल्याने यश हा वाहून गेला.

नदीपात्रात मुलगा बुडाल्याची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी पुलाजवळ गर्दी केली. या घटनेची माहिती समजताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत यश याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र तो आढळून आला नाही.

शहरातील वाळूतस्करांनी प्रवरा नदीतून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा केला आहे. यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या