Friday, April 26, 2024
Homeनाशिकधबधब्यात वाहून गेलेल्या नाशिकच्या 'त्या' युवकाचा मृतदेह सापडला

धबधब्यात वाहून गेलेल्या नाशिकच्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह सापडला

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

तालुक्यातील तोरंगण (Torangan) जवळील हेद आंबा हा धबधबा असून येथे नाशिकच्या जेलरोड भागातील (Jail Road Area) २० वर्षीय युवक काल रविवारी (दि.११) रोजी वाहून गेल्याची घटना घडली होती. यानंतर त्या युवकाचा मृतदेह आज सकाळी सापडला आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, जेलरोड परिसरातील १० जण हेद आंबा धबधब्यावर (Hed Amba Falls) गेले होते. याठिकाणी पाऊस व पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने जवळच असणाऱ्या नाचलोंडी नदीत (Nachlondi River) शुभम राजेंद्र चव्हाण (Shubham Rajendra Chavan) नामक युवक काल वाहून गेला होता.

त्यानंतर भोसला मिलिटरी स्कूलच्या (Bhosla Military School) रेसक्यू टीमच्या मदतीने काल शोधकार्य सुरु करण्यात आले होते. पंरतु अंधार पडल्याने हे शोधकार्य थांबविण्यात आले. यानंतर आज सकाळी हे शोधकार्य पुन्हा सुरु केले असता दोन किलोमीटरवर त्याचा मृतदेह (Dead Body) आढळून आला.

दरम्यान, यावेळी त्र्यंबक पोलीस ठाण्याचे (Trimbak Police Station) पोलिस अधिकारी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक व तोरंगण परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या