Friday, April 26, 2024
Homeनाशिकमिठाई विक्रेत्यांनी संकेतांचे पालन करावे

मिठाई विक्रेत्यांनी संकेतांचे पालन करावे

सातपूर । प्रतिनिधी Satpur

दिवाळी सणाच्या Diwali Festival काळात मिठाई व फराळाचे पदार्थ Sweets यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या कलावधीत बरेच व्यावसायिक मिठाई व फराळाचे पदार्थ उत्पादन व विक्रीचा व्यवसाय करतात. अन्न व औषध प्रशासनातर्फे सर्व अन्नपदार्थ व मिठाई विक्रेत्यांना शासनाने दिलेल्या तरतुदीचे पालन करून व्यवसाय करावा. जे व्यावसायिक शासनाच्या संकेतांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त Food and Drug Administration Joint Commissioner चंद्रशेखर साळुंखे Chandrasekhar Salunkheयांनी दिला आहे.

- Advertisement -

अन्नसुरक्षा व मानदे प्राधिकरण यांच्या आदेशानुसार सुट्या लूज स्वरुपात विक्रीसाठी प्रदर्शित केलेल्या भारतीय पारंपरिक मिठाई या अन्नपदार्थांच्या किंवा कंटेनरवर बेस्ट बिफोर तारीख टाकणे बंधनकारक केले आहे. मिठाई व्यावसायिकांनी नोटीस बोर्डवर मिठाईचे स्वरूप, त्यातील घटक पदार्थ प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.

अन्नसुरक्षा मानके कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक अन्न व्यावसायिकांनी आवश्यक परवाना किंवा नोंदणी घेऊनच आपला व्यवसाय सुरू करावा, अन्यथा कठोर कारवाई केली जाणार आहे.

परवाना व नोंदणीसाठी hppt://foscos.fsani.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचा असून आवश्यक शुल्कसुद्धा ऑनलाईन भरणा करावयाचे आहे. अन्न व्यवसायाच्या स्वरुपानुसार आवश्यक कागदपत्रे तसेच शुल्क वरील संकेतस्थळावर देण्यात आलेले आहे. नोंदणी नसणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या