Thursday, April 25, 2024
Homeनगरपाथर्डीत चोरट्यांनी फोडले दोन स्वीट होम दुकान

पाथर्डीत चोरट्यांनी फोडले दोन स्वीट होम दुकान

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शहरातील एकाच मालकाचे दोन मिठाई दुकाने अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना मंगळवारी घडली आहे. शहरातील शेवगाव रोडवरील जुन्या बस स्थानक रस्त्याच्या समोर असलेल्या हरी ओम बिकानेर स्वीट होम तसेच नगर रोडवरील भांडकर कॉम्पलेक्स मधील हरी ओम बिकानेर स्वीट होम हे दोन दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून चोरी केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. याबाबत दुकान मालक हरचंदासिंह नखतासिंह राजपुरोहित यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पुरोहित यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी (दि. 2) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुकान मालक यांनी हरी ओम बिकानेर स्वीट दुकान उघडण्या करिता आले असता, दुकानाचे लोखंडी कुलुप तुटलेले दिसले व दुकानाचे शटर उघडे होते. त्यानंतर दुकान मालकाने दुकानात जावुन पाहिले असता. दुकानातील सामान अस्थवेस्थ पडलेले होते. व दुकानातील पैशाचे काऊंटरमधील ठेवलेले चार हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. तर भांडकर कॉम्प्लेक्स मधील नगररोडच्या हरी ओम बिकानेर स्वीट नावाच्या दुकानातही आज्ञात इसमाने दुकानात चोरी केल्याची घटना घटना आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या