Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनराजमाता जिजाऊंची यशोगाथा अवतरणार मोठ्या पडद्यावर; लवकरच 'स्वराज्य कनिका-जिऊ' प्रेक्षकांच्या भेटीला

राजमाता जिजाऊंची यशोगाथा अवतरणार मोठ्या पडद्यावर; लवकरच ‘स्वराज्य कनिका-जिऊ’ प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | Mumbai

‘स्वराज्य कनिका -जिऊ’ चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले असून नवोदित अभिनेत्री ईश्वरी देशपांडे या चित्रपटात जिजाऊंच्या भूमिकेत पाहायला मिळतेय. या चित्रपटात ईश्वरी राजमाता जिजाऊंच्या बालपणीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे…

- Advertisement -

ईश्वरी देशपांडे हा एक नवीन चेहरा सिनेविश्वात पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे. आता ईश्वरीसह या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये जगदंबेचा आशीर्वाद मिळत असून जिजाऊंच्या नजरेतील तीक्ष्णता अचूक हेरली जातेय.

ताशी १२० किमी वेग, एकाच उडीत ‘त्याने’ कापले तब्बल २२ फूट अंतर; पाहा Viral Video

तर या चित्रपटाच्या निर्मात्या अनुजा देशपांडे यांचा ‘स्वराज्य कनिका -जिऊ’ हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. तसेच चित्रपटाची कथा, संकल्पना ही अनुजा देशपांडे यांचीच आहे.

Viral Video : नवरदेवासोबत लग्नाआधी घडली दुर्घटना; वधूने केले असे काही की पाहुणेही…

तब्ब्ल चार वर्ष केवळ राजमाता जिजाऊ यांचा जीवनप्रवास अभ्यासत ‘स्वराज्य कनिका – जिऊ’ची निर्मिती करण्याचं शिवधनुष्य त्यांनी पेललं आहे. प्रितम एस.के. पाटील यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. १२ जानेवारी २०२४ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सावधान! केळी खाताय? आधी ‘हा’ व्हिडीओ पाहा…

- Advertisment -

ताज्या बातम्या