Wednesday, April 24, 2024
Homeनगररस्ते बुजविण्यासाठी लाखो रुपये राखून ठेवले - स्वप्निल शिंदे

रस्ते बुजविण्यासाठी लाखो रुपये राखून ठेवले – स्वप्निल शिंदे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेला रस्ते खोदाईतून मिळालेले 2 कोटी 60 लाख रुपये शहर अभियंता सुरेश इथापे यांनी पदाचा गैरवापर करत परस्पर खड्डे बुजविण्यासाठी राखून ठेवले.

- Advertisement -

ही रक्कम बँकेत अनामत म्हणून ठेवली आहे. ही बाब गंभीर असून, याप्रकरणी लक्ष घालून ठेकेदारांनी केलेल्या कामाची बिले अदा करावीत, अशी मागणी सभागृह नेते स्वप्निल शिंदे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना दिलेल्या निवेदनात शिंदे यांनी म्हटले आहे, की सन 2019-20 या चालू आर्थिक वर्षात ठेकेदारांनी रस्ते खोदाई या लेखाशिर्षातील राखीव निधीतून कामे केली. ही कामे बांधकाम विभागाने केली.

बांधकाम विभागाने सदर कामांची बिले तयार करून ती लेखा विभागाकडे पाठविली, असे असताना रस्ते खोदाई या लेखा शिर्षाखाली जमा झालेले 2 कोटी 60 लाख रुपये खड्डे बुजविण्यासाठी राखीव ठेवले.

एवढेच नव्हे तर ही रक्कम बँकेत अनामत म्हणून ठेवली. हे करताना ठेकेदारांनी केलेल्या कामांचा विचार झाला नाही. हा निधी खड्ड्यांसाठीच राखीव ठेवायचा होता तर कामे प्रस्तावित का केली. त्यामुळे ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली असून, उपलब्ध निधी खर्चाचे नियोजन करण्याचा अधिकार स्थायी व महासभेचा आहे, असे असताना अधिकारी परस्पर निधी इतर कामासाठी राखीव कसे ठेवतात.

त्यांना तो अधिकार आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. हा प्रकार अत्यत गंभीर असून, अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे ठेकेदारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. ठेकेदारांनी केलेल्या कामांचे पैसे मिळावेत, अशी मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या