Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यास्वामी विवेकानंदांचे विचार भारताला विश्वगुरु बनवेल : भिडे

स्वामी विवेकानंदांचे विचार भारताला विश्वगुरु बनवेल : भिडे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्वामी विवेकानंद ( Swami Vivekanand ) यांच्या विचारांत मोठी ताकद असून, त्याची कास धरल्यास भारत निश्चितच विश्वगुरु बनेल, असा विश्वास पद्मश्री पुरस्कार विजेत्या आणि कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे ( Nivedita Bhide )यांनी केले.

- Advertisement -

नाशकात उद्यमनगरीची मुहूर्तमेढ रोवणारे पद्मश्री कै.बाबूभाई राठी यांच्या स्मृतिदिनाचे (Memorial Day of Padmashri Late Babubhai Rathi) औचित्य साधून अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AIMA), नाईस आणि लघुउद्योग भारती यांच्यावतीने भिडे यांच्याशी सुसंवाद आणि त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर आयामाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी,नाईसचे उपाध्यक्ष रमेश वैश्य,आयामाचे बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, सरचिटणीस ललित बूब,लघुउद्योग भारतीचे सरचिटणीस निखिल तापडिया, निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, विवेकानंद केंद्राचे सहसंचालक विष्णू शेजवळकर आदी होते.

भारताची संस्कृती महान आहे. येथे विविध जाती,पंथाचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. भारताला एकसंघ ठेवण्याचे,आपली मौल्यवान जीवनमूल्ये टिकविण्याचे तसेच कोणत्याही संकटावर मात करण्याचे सामर्थ्य स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणुकीतच असल्याचे सांगून भिडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखविले.

प्रास्ताविकात निखील पांचाळ यांनी मुंबई, पुण्यानंतर नाशिक हेच उद्योगवाढीचे राज्यातील एकमेव महत्वपूर्ण डेस्टिनेशन असल्याचे सांगताना लवकरच नाशिक हे आयटी हब बनणार आहे. त्यामुळेच या सर्व गोष्टी ज्यांच्यामुळे शक्य झाल्या त्या सर्वांचे स्मरण करणे आमचे आद्यकर्तव्य असल्याचे निखील पांचाळ यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार रमेश वैश्य यांनी मानले.

कार्यक्रमास माजी अध्यक्ष जे.एम. पवार, धनंजय बेळे, राजेंद्र अहिरे, आयपीपी वरुण तलवार, दीपक राठी, जयप्रकाश राठी, अण्णासाहेब देशमुख,डी.जी.जोशी, मधुकर ब्राह्मणकर, आयामाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, सहसचिव योगिता आहेर, दिलीप वाघ, पूजा महाजन, संदीप महाले, निशिकांत अहिरे,

अविनाश मराठे, देवेंद्र राणे, रवींद्र झोपे, अशोक ब्राह्मणकर, भावेश बोरसे, आर.काटकर, मिलिन्द देशपांडे, निखिल तापडिया, अतुल देशमुख, योगेश बहाळकर, ओमप्रकाश कुलकर्णी, उमेश कोठावदे, संदीप चोबे,प्रशांत गांगुर्डे, अतुल निलख, आशिष खारवर, जगदीश पाटील, जयंत पगार, राहुल गांगुर्डे, शिवशंकर गोडेकर, मदन भंदुरे, प्रदीप जाधव, रमेश कनानी, सूरज श्रीवास्तव, अजित चव्हाण, नाईसचे दिनेश पाटील आणि विवेकानंद केंद्र देवगिरीचे संचालक विश्वास देवकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या